कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूरचे उपअधीक्षक बापूसाहेब रामचंद्र चौगले (वय ५८, रा. मुरगूड, सध्या कळंबा) यांचे सोमवारी पहाटे कोरोनाने निधन झाले. दि. ३० एप्रिलपासून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सेवानिवृत्तीसाठी अवघे दहा दिवस राहिले असतानाच त्याचे निधन झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
उत्तम कुस्तीपटू, कबड्डीची आवड असणारे बापूसाहेब चौगले यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात ३५ वर्षे सेवा बजावली. ३१ मे २०२१ रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. दि. २० एप्रिल रोजी ते मुरगूड गावी गेले होते. त्यानंतर त्यांना ताप व अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांकडून औषध घेऊन घरात थांबले होते. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. आठ ते दहा दिवस उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अंत्यसंस्कार मुरगूड गावात करण्यात आले.
फोटो नं. १००५२०२१-कोल-बापूसाहेब चौगुले (निधन)
===Photopath===
100521\10kol_2_10052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. १००५२०२१-कोल-बापूसाहेब चौगुले (निधन)