सांगली : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे आता नव्याने स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाच्या राज्यमंत्रिपदाचीही जबाबदारी देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिराळा येथे शेतकरी मेळाव्यात जाहीर केले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यामुळे आता सदाभाऊ खोत यांच्याकडे कृषी, पणन या विभागांसह पाणीपुरवठा व स्वच्छता याही खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. दोनच दिवसांपूर्वी खोत यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. ती स्वीकारण्याआधी आता नव्याने आणखी दोन विभाग खोत यांच्याकडे दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिराळा येथे हा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)
मुसळगाव गटात इच्छुकांचा हिरमोड
By admin | Published: December 31, 2016 11:02 PM