कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातील तसेच ताराबाई रोडवरील विक्रेत्यांनी केलेल्या विरोधानंतरही महानगरपालिका अतिक्रमण विभागाने शनिवारी विक्रेत्यांनी केलेले रस्त्यावरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले. जवळपास शंभरहून अधिक विक्रेत्यांना कपिलतिर्थ भाजी मंडईजवळील वाहनतळाच्या जागेवर पर्यायी तात्पुरती जागा दिली आहे. त्यामुळे विक्रेते स्वत:हून स्थलांतर झाले.अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सव जवळ आला असल्यामुळे मंदिराच्या महाद्वारातील तसेच ताराबाई रोडवरील मित्रप्रेम तरुण मंडळापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार सर्व विक्रेत्यांना शनिवारी कोणीही रस्त्यावर व्यवसाय करु नका अशा सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सर्व विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे आपले स्टॉल लावले.
शेवटी अर्ध्या तासाची मुदत द्या आम्ही चर्चा करुन सांगतो असे गवळी म्हणाले. त्यामुळे काही काळ कारवाई थांबविण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता सर्वच विक्रेत्यांनी भाजी मंडईतील पर्यायी जागेवर जाण्याचा निर्णय घेऊन साहित्य हलविले. कारवाईवेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.