शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

निधीची तरतूद, तरी कोल्हापूर महापालिकेला रंकाळा महोत्सव, फुटबॉल, कुस्तीचा विसर

By भारत चव्हाण | Updated: March 3, 2025 15:51 IST

संयोजन कोणी करायचे म्हणून टाळाटाळ

भारत चव्हाण कोल्हापूर : शहराच्या विकास कामांसह विविध सेवा सुविधा देण्याची प्राथमिक कर्तव्ये पार पाडत असतानाच विविध क्षेत्रातील खेळाडू, कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाला कुस्ती, फुटबॉल स्पर्धेचा तसेच रंकाळा महोत्सवाचा विसर पडला आहे. विशेष म्हणजे अंदाजपत्रकात तरतूद करूनदेखील संयोजन करायचं काेणी असं म्हणत अधिकाऱ्यांनी जबाबदारी टाळली जात आहे.कोल्हापूर शहराला कला, क्रीडा, सांस्कृतिक परंपरेचा फार मोठा वारसा आहे. या वारसाचे जनत करणे आणि नवनवीन कलाकारांना, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समस्त कोल्हापूरकरांचे मनोरंजन करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन महानगरपालिकेकडून वार्षिक अंदाजपत्रकात विशिष्ट निधीची तरतूद केली जाते. रंकाळा महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा असे दोन बजेटहेड देखील अंदाजपत्रकात आजही कायम आहेत.रंकाळा महोत्सवात पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज, पंडित शिवकुमार शर्मा, गझल गायक पंकज उधास, गायक अजित कडकडे, उषा मंगेशकर, शुभा मुदगल, के. के., महालक्ष्मी अय्यर, कुणाल गांजावाला, सुधा चंद्रन यांच्या यांच्यासारख्या श्रेष्ठ कलाकारांच्या नृत्य, गायन, वादन, नृत्याविष्काराने कोल्हापूरकर तृप्त झाले. आता हा ‘रंकाळा महोत्सव’ गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे.कोल्हापूर शहरातील आवडा खेळ म्हणजे फुटबॉलकुस्ती होय. या दोन्ही खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता महापौर चषक फुटबॉल स्पर्धा तसेच महापौर केसरी कुस्ती स्पर्धा भरविली जात होती. कोरोना काळात या स्पर्धा बंद पडल्या, त्यानंतर एकदा कसे तरी करून अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या दोन्ही स्पर्धांचे संयोजन केले. कुस्ती व फुटबॉल सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यातून मल्ल तसेच फुटबॉल संघांना आर्थिक मदत होत राहिली. परंतु आता या स्पर्धाकडेही दुर्लक्ष झाले आहे.जबाबदारी कोणाकडे..अधिकारी दोन तीन वर्षांनी नवीन येतात, त्यांना येथील उपक्रमाची माहिती नसते. प्रत्येक वर्षी स्थानिक अधिकारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तरतूद करून ठेवतात. मात्र ही जबाबदारी कोणी स्वीकारायची म्हणून चक्क स्पर्धाच घेण्याचे टाळले जात आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी असताना ही मंडळी आवडीने संयोजनात पुढाकार घेत होते. परंतु आता गेल्या साडेचार वर्षापासून लोकप्रतिनिधीच नसल्याने या स्पर्धांचा विसर पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfundsनिधीWrestlingकुस्तीFootballफुटबॉल