शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

नियतीने कॉन्स्टेबल दिग्विजयचा संसार अर्ध्यातच मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 9:53 AM

Death police Kolhapur- वडिलांनी आयुष्यभर खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करून कुटुंब घडविले. आता मुलगा मुंबई पोलीस दलात नोकरीला लागल्याने पांग फिटला असे त्यांना वाटले होते; परंतु कुटुंबाची बसलेली घडी नियतीला बघवली नाही. त्यांचा तरणाताठा मुलगा दिग्विजय हिंदुराव तळेकर (वय ३१) याचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. छातीत कळ आल्याचे निमित्त झाले आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दिग्विजय आज, बुधवारी ड्यूटीवर हजर होणार होता; परंतु क्रूर नियतीने त्याला जणू आपल्या ड्यूटीवरच नेले.

ठळक मुद्दे नियतीने कॉन्स्टेबल दिग्विजयचा संसार अर्ध्यातच मोडला भुयेवाडी पंचक्रोशीत हळहळ : तिशीतच हदयविकाराचा धक्का

कोल्हापूर : वडिलांनी आयुष्यभर खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करून कुटुंब घडविले. आता मुलगा मुंबई पोलीस दलात नोकरीला लागल्याने पांग फिटला असे त्यांना वाटले होते; परंतु कुटुंबाची बसलेली घडी नियतीला बघवली नाही. त्यांचा तरणाताठा मुलगा दिग्विजय हिंदुराव तळेकर (वय ३१) याचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. छातीत कळ आल्याचे निमित्त झाले आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दिग्विजय आज, बुधवारी ड्यूटीवर हजर होणार होता; परंतु क्रूर नियतीने त्याला जणू आपल्या ड्यूटीवरच नेले.एका क्षणात होत्याचे नव्हते होते म्हणजे काय होते याचाच अनुभव भुयेवाडी (ता. करवीर) येथील तळेकर कुटुंबीय घेत आहेत. दिग्विजयच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांचा त्याच्या मृत्यूवर विश्वासच बसला नाही. तळेकर हे अत्यंत सामान्य कुटुंब. शेती जेमतेमच. वडिलांनी चालक म्हणून नोकरी करून त्याला शिक्षण दिले. दिग्विजय एकुलता मुलगा. तो उत्तम गाणी म्हणायचा. माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तीरीह्ण हा त्याचा अत्यंत आवडीचा अभंग. तो हा अभंग गाऊ लागला की लोकही तल्लीन होऊन जात.

पोलीस खात्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे गाणे हमखास असायचे. प्रकृतीनेही चांगला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तो मुंबई पोलीस दलात भरती झाला. त्यानंतर गेल्या ७ जूनला लग्न झाले. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्यामुळे घरात कमालीचे आनंदाचे वातावरण होते. दोनच दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता आणि पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तो जागा झाला. घशात खवखवही होत होती. त्यानंतर उलटी झाल्याने थोडे बरे वाटले; परंतु तोपर्यंतच तो खाली कोसळला. तातडीने त्याला सीपीआरला हलविले; परंतु सगळेच संपले होते. त्याच्या निधनानिमित्त गावाने व्यवहार बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली.कोरोना लस घेतल्यानंतर...तो पोलीस दलात असल्याने दहा दिवसांपूर्वी त्याने कोरोना लस घेतली होती. त्यानंतर दोन दिवस त्याला भोवळ येत होती. दंडही दुखत होता; परंतु त्यानंतर त्याने ड्यूटी केली व प्रकृतीची तक्रार नसल्याने सुट्टीवर गावी आला. शवविच्छेदनानंतर त्याचा व्हिसेरा मात्र राखून ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर