इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील महावितरण कार्यालयासमोर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याच्या तयारीत असणाऱ्या विकी गजानन धुमाळ (वय ३८, रा. कबनूर) याला मात्र शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. घरातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून तो आत्मदहन करणार होता. घराचे बांधकाम करताना विकी याने थ्री फेज वीज जोडणी घेतली होती. त्याचे दीड वर्षांपासून 14600 रुपये थकबाकी आहे. थकबाकीपोटी शनिवारी धुमाळ याच्या घरातील वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला. त्यामुळे धुमाळ याने कबनूर येथील महावितरण कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाची तयारी केली होती. शिवाजीनगर पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्याला रोखल्याने अनर्थ टळला. त्याच्याकडील पेट्रोलची बाटली जप्त केली. वीज जोडणी बदलण्यासाठी त्याने महावितरणकडे पाठपुरावा केला होता परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यात वीज कट केल्याने त्याने संताप व्यक्त केला.
आत्मदहन करण्याच्या तयारीत असणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:26 AM