शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

तोतया आएएस अधिकाऱ्यास अटक

By admin | Published: August 19, 2015 12:25 AM

मलकापूरजवळ कारवाई : सहकारीही गजाआड; योजनेच्या लाभाने फसवणूक

मलकापूर : योजना आयोगामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी वसंत ज्ञानू पाटील (रा. पेरिड, ता. शाहूवाडी) याच्यासह दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी गाडी, बोगस कागदपत्रे हस्तगत केली आहेत. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी, दुपारी तीन वाजता पिशवी-सोनवडे रस्त्यावर शाहूवाडी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. वाहनांची तपासणी करीत असता अचानक भरधाव वेगाने भारत सरकार असे लिहिलेली अम्बॅसेडर गाडी आली. ती थांबविताच त्यातील एका युवकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडून शाहूवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याजवळ बोगस कागदपत्रे होती. यावेळी प्रमुख संशयित वसंत पाटील (पेरिड), महेश सीताराम गुरव, सुप्रिया नागेश गुरव (रा. खडीओजरे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत जाऊन योजना आयोगाचा लाभ मिळवून देतो, असे सांगून नागरिकांकडून पैसे घेऊन त्याची फसवणूक हे सर्व करीत होते. त्यांची गाडीदेखील चोरीची असल्याचे समजते. काटे भोगाव (ता. पन्हाळा) येथे त्यांचे वास्तव होते. या टोळीत अनेक तरुणांचा समावेश असल्याचे समजते. वसंत पाटील हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्यावर शाहूवाडी, कराड, इस्लामपूर, शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जे.सी.बी. मशीन, डंपर, ट्रक, जनरेटर, आदी साहित्यांची चोरी करून तो गेली तीन वर्षे फरार होता. शाहूवाडी पोलीस ठाण्यात पिस्तूल जवळ बाळगल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर नोंद आहे. त्याने नोकरी लावतो म्हणून नागरिकांची फसवणूक केली आहे. एक महिन्यापूर्वी पोलिसांनी त्याला पकडण्याचा कसोसिने प्रयत्न केला असता तो पळाला होता. (प्रतिनिधी)