शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हिंदूऐवजी लिंगायत धर्म नोंद करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 11:01 AM

Lingayat Kolhapur- लिंगायत धर्माचा दर्जा मिळविण्यासाठी आता नव्याने रणशिंग फुंकण्याचा निर्धार सोमवारी येथे करण्यात आला. जनगणनेवेळी हिंदूऐवजी केवळ लिंगायत धर्म अशीच नोंद करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

ठळक मुद्दे लिंगायत धर्मासाठी नव्याने रणशिंग फुंकणार चित्रदुर्ग मठात बैठकदिशाभूल करणाऱ्यांचा शुक्रवारी समाचार

कोल्हापूर : लिंगायत धर्माचा दर्जा मिळविण्यासाठी आता नव्याने रणशिंग फुंकण्याचा निर्धार सोमवारी येथे करण्यात आला. जनगणनेवेळी हिंदूऐवजी केवळ लिंगायत धर्म अशीच नोंद करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

शुक्रवारी (दि. ५) जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. यावेळी दिशाभूल करणाऱ्यांचा समाचार घेतला जाणार आहे. जनगणना २०२१ लिंगायत समाजाची भूमिका या विषयासंदर्भात दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्र कोल्हापूरच्यावतीने ही बैठक झाली. यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे शंकर गुडस, शरण परूशेट्टी, राजाभाऊ शिरगुप्पे, सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, बाबूराव तारळी प्रमुख उपस्थित होते.शंकर गुडस म्हणाले, समाजातील मुलांना ९५ टक्के गुण मिळवूनही पुढील वर्षात प्रवेश मिळत नाही, हे वास्तव आहे. समाजाच्या अडचणीमध्ये भरच पडत आहे. यामुळे लिंगायत धर्मासाठीचे आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. आता नाही तर कधीच नाही, अशी स्थिती आहे. कोल्हापुरातील समाजाने जागातिक लिंगायत महासंघाच्या माध्यमातून नव्या जोमाने लढा सुरू केल्यास दहा हत्तींचे बळ मिळेल.शरण परुशेट्टी यांनी प्रत्येक गावातील लोकांमध्ये लिंगायत धर्माच्या मागणीसंदर्भात जनजागृती करावी, एकजुटीने लढा दिल्यास नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बी. एम. पाटील यांनी, लिंगायत धर्माचा दर्जा का मिळावा, याची माहिती दिली.राजा शिरगुप्पे म्हणाले, ८०० वर्षांपूर्वी बसवाण्णा यांनी माणसांमध्ये माणूसपण रुजवले. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र, अमूलाग्र बदल झाले असून मूठभर लोक स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे पुन्हा बसवाण्णांचे विचार समाजात रुजवण्याची वेळ आली आहे. यावेळी राजशेखर तंबाके, बाबूराव तारळी, मिलिंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सरलाताई पाटील म्हणाल्या, काही शक्ती लिंगायत धर्माच्या आंदोलनात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. शनिवारी सकाळी १० वाजता याच ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख सदस्यांचा मेळावा आणि जागतिक लिंगायत महासंघाच्या शाखेची स्थापना केली जाईल. आंदोलनाचे नव्याने रणशिंग फुंकले जाईल.

 

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाkolhapurकोल्हापूर