शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Kolhapur News: देवस्थान समितीने रोखले जमीन सर्वेक्षणाचे २७ लाख, सारआयटी कंपनीचे काम असमाधानकारक

By इंदुमती सूर्यवंशी | Published: January 17, 2023 6:58 PM

महसूलकडून का सर्वेक्षण नाही ?

इंदुमती गणेशकोल्हापूर : असमाधानकारक कामगिरीमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने जमीन सर्वेक्षणाचे काम दिलेल्या सारआयटी कंपनीचे २७ लाख रुपयांचे बिल थकीत आहे. या कंपनीला दिलेली फेब्रुवारी २०२३ पर्यंतची मुदतवाढ देखील पुढील महिन्यात संपणार आहे. कामाची गती आणि दर्जा बघता उरलेल्या मंदिरांचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण होणे अशक्य आहे. एवढा भोंगळ कारभार असताना जिल्हाधिकारी त्यांना मुदतवाढ देणार की निविदाच रद्द करणार याकडे आता लक्ष लागले आहे.देवस्थान समितीच्या अखत्यारीतील ३०४२ मंदिरे व जमिनींच्या सर्वेक्षणाचे काम मुंबईच्या सारआयटी कंपनीला देण्यात आले आहे. त्यांची निविदा मार्च २०१९ मध्ये मंजूर करून १७ फेब्रुवारी २०२० रोजी वर्कऑर्डर देण्यात आली. सर्वेक्षणासाठी ५ कोटी ७७ लाख रुपये ठरले असून त्यापैकी १ कोटी ३ लाख ८६ हजार इतकी रक्कम १८ टक्के जीएसटीची आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी ४ कोटी ७३ लाख १४ हजार इतका खर्च अपेक्षित होता.

एका मंदिरासाठी साधारण १५ हजार ५५३ रुपये इतका सांगण्यात आला आहे. उरलेली ६० लाख ५० हजार ही रक्कम सॉफ्टवेअर व सर्व्हरची दाखवली गेली आहे. समितीने १२०० गावांच्या सर्वेक्षणासाठीच्या ६ बिलांच्या १ कोटी ९१ लाख २५ हजार इतक्या रकमेपैकी १ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम कंपनीला अदा केली आहे. सर्वेक्षणाचे काम असमाधानकारक असल्याने २७ लाख ९ हजार ३७२ रुपये राखीव ठेवले आहेत.

२०२० साली कुठे पूर होता?कंपनीला काम देताना एक वर्षाची मुदत देण्यात आली होती; मात्र लगेच कोरोना सुरू झाल्याने काम थांबले ही वस्तुस्थिती समजण्यासारखी आहे; पण त्यावर्षी म्हणजेच २०२० साली पूरपरिस्थितीमुळे सर्वेक्षणात अडथळे आल्याचे देवस्थानने दिलेल्या माहितीत नमूद आहे; पण ते चुकीचे आहे कारण पूर २०२० नव्हे तर २०२१ साली आला होता.मुदतवाढ वर मुदतवाढकोरोना काळात काम करणे शक्य नव्हते हे मान्य आहे; पण कोरोना संपूनदेखील दीड वर्ष उलटून गेला. करारानुसार कंपनीने एका वर्षात काम संपवणे अपेक्षित होते. त्यानंतर दीड वर्ष गेला तरी काम का होत नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ मागितली होती जी जुलै २०२२ मध्ये देण्यात आली. हा कालावधी संपायला एक महिना राहिला असताना पुन्हा कंपनीने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे.महसूलकडून का सर्वेक्षण नाही ?जमिनींची मोजणी, सर्वेक्षण, नकाशे, सातबारा उतारे यात महसूलची मास्टरी आहे. आता सातबारा उतारे ऑनलाईन मिळतात, ई नकाशे काढता येतात, गुगलमॅपद्वारे वस्तुस्थिती कळते. जिल्हाधिकारीच देवस्थानचे अध्यक्ष आहेत त्यामुळे महसूलची मदत घेऊन देवस्थानच्याच वतीने वेगाने सर्वेक्षण करता येते. मग खासगी कंपनीला देवस्थानची गंगाजळी का द्यायची याचा विचार होणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर