शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

विकासकामांत अडथळे आणू नयेत

By admin | Published: April 18, 2017 1:01 AM

मलकापूर नगरपालिका सभा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार

मलकापूर : विरोधकांनी विकासकामांत अडथळे आणू नयेत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार करून महाराष्ट्रात पालिकेच्या कारभाराचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी केले. मलकापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.प्रभारी मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी स्वागत केले. रेडझोनमध्ये बांधकाम करण्यास कोणाची परवानगी घेतली. टेंडर नोटीस काढताना विरोधकांना विश्वासात घ्या, असा प्रश्न विरोधी आघाडीचे सदस्य सुहास पाटील यांनी मांडला. यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत खडाजंगी झाली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेची संमती घेऊन भाजी मार्केट, ब्रह्मपुरी रस्ता, आदी कामांना रितसर परवानगी घेऊन कामे सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत एक कोटी ६४ लाख रुपयांचा निधी परत घालविला आहे. भाजी मार्केट इमारत व ब्रह्मपुरी रस्ता यामध्ये पालिकेचे पैसे वाचलेले आहेत. टेंडर कमी दराची मंजूर केली आहेत. विकासकामात विरोधकांनी अडथळा आणू नये, असे नगराध्यक्ष अमोल केसरकर, बांधकाम सभापती राजू प्रभावळकर, उपनगराध्याक्ष दिलीप पाटील यांनी उत्तर दिले.मंगळवार पेठेतील बांधकाम करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे का? वर्क आॅर्डर लाईन आऊट दिली का? असा प्रश्न सुहास पाटील यांनी मांडला. सदरचे काम करण्यास पालिकेने परवानगी दिलेली आहे, असे नगराध्यक्ष यांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी रेडझोनमध्ये बांधकामे सुरू केली आहेत. त्यांना प्रशासनाने अडथळे आणू नयेत. विरोधकांना विश्वासात घेऊन विकासकामे राबवावीत, असे सुहास पाटील, माया पाटील, आण्णा पळसे यांनी प्रश्न उपस्थित केला. पालिका शिपाई राजेंद्र भारती याने पाणीपट्टी करवसुलीत घोटाळा केला होता. त्याला निलंबित केले होते. मागील बॉडीने त्याला कामावर घेऊन त्याचा पगार काढला आहे. जनतेत गैरसमज पसरवू नका, असे राजू प्रभावळकर यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांचे २० लाख रुपये सांगलीतील लाईट ठेकेदाराला का दिले? याचे विरोधकांनी उत्तर द्यावे, असे प्रभावळकर, विकास देशमाने, मानसिंग कांबळे यांनी सांगितले. दिलीप पाटील यांनी आभार मानले.