म्हालसवडे : आमदार पी. एन. पाटील यांनी वाड्या-वस्त्यांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या फंडातून भोगमवाडी, तेरसवाडी, मल्लेवाडीसारख्या दुर्गम वाड्या-वस्त्यांच्या रस्ते कामाकरिता २५ लाखांचा निधी मिळाला आहे. रस्ते कामामुळे तेरसवाडीसहित येथील वाड्या-वस्त्यांच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन उद्योजक रामचंद्र भोगम यांनी केले.
भोगमवाडी (ता.करवीर) येथे आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून झालेल्या तेरसवाडी फाटा ते भोगमवाडी या रस्ते कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्योजक रामचंद्र भोगम यांच्या हस्तेच रस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले. भोगमवाडी अंतर्गत रस्ते डांबरीकरण पाच लाख, तेरसवाडी फाटा ते भोगमवाडी रस्ता दहा लाख, तेरसवाडी ते मल्लेवाडी रस्ता डांबरीकरण दहा लाख अशा २५ लाख रुपयांच्या कामाला सुरुवात करण्यात आली.यावेळी माजी सरपंच बळवंत पाटील, सरपंच बबन कदम, उपसरपंच महादेव सुतार, सदस्या रंजना जाधव, तानाजी भोगम, परशुराम कदम, सागर ढेरे, रंगराव भोगम, तुकाराम रायकर, आप्पासाहेब जाधव, मधुकर भोगम, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फोटो : १५ भोगमवाडी
भोगमवाडी (ता. करवीर) येथे रस्ते कामाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक रामचंद्र भोगम, शेजारी बळवंत पाटील, बबन कदम, तानाजी भोगम आदी.