शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

आधुनिक तंत्रज्ञानामुळेच वस्त्रोद्योगाचा विकास

By admin | Published: April 30, 2015 9:17 PM

कल्लाप्पाण्णा आवाडे : इचलकरंजीत टेक्स्पोजर-२०१५ यंत्रसामग्री प्रदर्शन, परिषदेस प्रारंभ

इचलकरंजी : देशाच्या वस्त्रोद्योगामध्ये विकेंद्रित क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इचलकरंजीची प्रगती कौतुकास्पद आहे. जुन्या पिढीतील उद्योजक व कामगार वर्गाने केलेले कष्ट आणि वस्त्रोद्योगामध्ये आणलेले आधुनिक तंत्रज्ञान यामुळेच येथील वस्त्रोद्योगाचा विकास झाला. आता इचलकरंजी शहराला वस्त्रोद्योगाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात महत्त्वाचे स्थान पटकावयाचे असून, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या यंत्रसामग्रीच्या प्रदर्शनाचा मोठा फायदा होईल, असे उद्गार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी काढले.शहरामधील मॉडर्न स्कूलजवळील मैदानात भरविण्यात आलेल्या टेक्स्पोजर - २०१५ या वस्त्रोद्योगातील यंत्रसामग्री प्रदर्शन आणि परिषद यांच्या प्रारंभाच्या कार्यक्रमात माजी खासदार आवाडे बोलत होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या भाषणात रोटरीचे प्रांतपाल गणेश भट्ट म्हणाले, टेक्स्पोजरसारख्या उपक्रमातून उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व नवीन उत्पादनाची संधी उपलब्ध होईल. ज्यामुळे आणखीन रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळेल. यावेळी आपल्या प्रमुख भाषणामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात असलेल्या विविधतेचा आढावा घेतला व सध्याच्या नवीन पिढीतील उद्योजक वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले.सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष अमर डोंगरे यांनी स्वागत व प्रा. यू. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सत्यनारायण रांदड यांनी प्रदर्शन व परिषदेविषयी माहिती सांगितली. प्रा. एम. वाय. गुडियावाल व राजेंद्र सांगले यांनी स्मरणिकेचे प्रकाशन केले. यतिराज भंडारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)