कोल्हापूर : एकीकडे विकासकामांचा सुकाळ अन् दुसरीकडे दुष्काळ अशी काहीशी परिस्थिती साईक्स एक्स्टेंशन प्रभागाची झाली आहे. मुख्य रस्ते झालेत पण , अंतर्गत रस्ते, गटारी, स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांच्या आहेत. साईक्स एक्स्टेंशन प्रभाग हा उच्चभ्रू व सामान्य अशा नागरी वसाहतीत विभागला गेला आहे. जिल्हा बँक, बागल चौक, टाकाळा मोहल्ला या नागरी वस्तीतील कचरा उठाव व स्थानिक नगरसेवकांचा कमी जनसंपर्क अशा अनेक समस्या आहेत. दुसरीकडे, फक्त साईक्स एक्स्टेंशन परिसरात विकासकामे झाल्याच्या तक्रारी काही नागरिकांच्या आहेत. विकासकामे करताना नगरसेवकांनी दुजाभाव का केला? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या २० ते २५ वर्षांत साईक्स एक्स्टेंशन परिसरातील लोकप्रतिनिधी विजयी झाला आहे, हा इतिहास आहे. त्यामुळे जिल्हा बँक, बागल चौक या परिसरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये झाली आहे.विद्यमान नगरसेवक संजय मोहिते --
विकासकामांत ‘दुजाभाव’
By admin | Published: March 01, 2015 10:32 PM