शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

समरजित घाटगेंची नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली; म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 1:37 PM

कागलच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या मुश्रीफ यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने घाटगे नाराज

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असला तरी तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. ते कुठे तुमच्या आडवे आले तर त्यांना परतवण्याची ताकद आमच्याकडे आहे, असा विश्वास देतानाच सध्याची विधानसभेची तयारी चालूच ठेवा, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना मंगळवारी स्पष्ट शब्दात सांगितले. या गटाच्या वतीने आज बुधवारी त्यासंदर्भातील भूमिका प्रेसनोट काढून स्पष्ट केली जाणार आहे.कागलच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या मुश्रीफ यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने घाटगे रविवारपासून नाराज झाले होते. ते पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती. परंतू या सर्व शक्यतांना त्यांनीच पूर्णविराम दिला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या मंत्रालयातील कक्षात सुमारे पाऊण तास चर्चा झाली.यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष बाळ घोरपडे, कागल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, शाहूचे संचालक युवराज पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, सुनील मगदूम आदी उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. त्यांनीही कोणताही वेगळा विचार करू नका, असे सांगितले.मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात सहभाग आहे, त्यांनी काय भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आताही कागलच्या राजकारणात मुश्रीफ, संजय घाटगे गट विरोधात आहेत. खासदार संजय मंडलिक गट सोबत असला तरी त्यांच्यावर कोणताच भरवसा नाही. अशा स्थितीत तिन्ही गट अंगावर घेऊन राजकारण करताना भाजपची ताकद महत्त्वाची आहे. विधानसभेवेळी महाराष्ट्राचे चित्र नक्की कसे राहते याचा आज काहीच अंदाज नाही. त्यावेळी ज्या त्या पक्षाने निवडणुका लढवायच्या ठरवल्या तर भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळू शकते.आता सहा वर्षे भाजपमध्ये चांगले स्थान निर्माण केले असताना वेगळा विचार करू नये, असाही मतप्रवाह गटाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त झाला. त्याचीही चर्चा या बैठकीच्या केंद्रस्थानी राहिली. मी यापूर्वीही तुमचे कोणते पत्र आले आणि ते प्रलंबित ठेवलंय, असा अनुभव नाही. यापुढेही तसे घडणार नाही. जी काही ताकद द्यावी लागेल ती देण्यासाठी सक्षम असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी निक्षून सांगितले.

काँग्रेस, ठाकरे गटाकडून संपर्कघाटगे नाराज असल्याचे समजताच काँग्रेससह शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. कागल विधानसभेसह लोकसभा उमेदवारीसाठीही चाचपणी केल्याचे समजते. परंतु घाटगे यांनी त्यास तूर्त कोणताच प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस