दुर्वा दळवीकोल्हापूर : उद्या, शनिवारी दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा संपन्न होणार आहे. डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल होत आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यातून भाविक डोंगरावर दाखल झाल्याने परिसर फुलून गेला आहे. अशातच एका भाविकाने नवस फेडण्यासाठी काठीवरुन तब्बल १०० किलोमीटर अंतर चालत पार केले आहे. कर्नाटकातील हा भाविक यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.यात्रेनिमित्त देवाला भाविक नवस बोलण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी ही येतात. असाच एक नवस फेडण्यासाठी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील ज्योतीगौडा इरगोंडा मांगनुरे हा भाविक २०-२५ नाही तर तब्बल १०० किलोमीटर अंतर काठीवरुन चालत डोंगरावर दाखल झाला आहे. पोहचायला लागले तीन दिवसदोन्ही पायाला काठी बांधून त्यावरून चालत त्यांनी प्रवास केला आहे. त्यांना हा प्रवास पुर्ण करण्यासाठी तीन दिवस लागले. नवस फेडण्यासाठी जात असताना जोतिबाच्या नावाने चांगभलं, काळभैरवाच्या नावाने चांगभलं असा गजर करत ते निघाले होते. ज्योतीगौडा यांच्या या कृतीने सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
Kolhapur: दोन्ही पायाला काठी, तीन दिवस प्रवास; नवस फेडण्यासाठी तब्बल १०० कि.मी. चालत भक्त आला जोतिबा भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:38 IST