जोतिबा : जोतिबा मंदिराच्या आवारात आता एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा बसविण्यात येणार आहे. ही महाघंटा सांगलीतील भाविकाने जोतिबा चरणी अर्पण केली आहे. येत्या शुक्रवारी (दि .२७ ) ही एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा मंदिर आवारात बसवण्यात येणार आहे.घंटेची उंची पावणेचार फूटपलूस-बुरली येथील भाविक सर्जेराव हिंदुराव नलवडे यांनी स्वखर्चाने बनवलेली ही महाघंटा 'श्री' च्या चरणी अर्पण करणार आहेत. या घंटेची उंची पावणेचार फूट असून, यासाठी पंचधातू वापरला आहे. या घंटेचा ३६० अंश कोनात लंबक तयार केला आहे.नलवडे यांनी यापूर्वी २००० साली बसविली होती महाघंटानलवडे जोतिबा देवाचे निस्सीम भक्त असून दर रविवारी व पौर्णिमेदिवशी ते डोंगरावर येतात. २००० मध्ये त्यांनी यापूर्वीची महाघंटा बसविली होती. गेल्यावर्षी ही घंटा तडे गेल्याने खराब झाली होती. नलवडे यांना हे समजताच त्यांनी नवीन घंटा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पलूस येथील केदार मेटल फौंड्रीत या महाघंटेचे काम सुरू आहे.विधीवत कार्यक्रमात महाघंटेची प्रतिष्ठापनायेत्या शुक्रवारी महाप्रसाद आणि विधीवत कार्यक्रमात महाघंटेची प्रतिष्ठापना होणार आहे. जोतिबा मंदिरातील दत्त मंदिराच्या पाठीमागील बाजुस असणाऱ्या घंटाघरामध्ये ही महाघंटा बसवली जाणार आहे.मंदिराचे दरवाजे उघडताना वाजवली जाते घंटाश्री जोतिबा मंदिरातील महाघंटा ही दररोज पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडताना वाजवली जाते. मंदिरात महाप्रसाद, किरणोत्सव, पालखी सोहळा वेळी या महाघंटेचा नाद होतो.
Jyotiba Temple: जोतिबाच्या चरणी एक टनाची 'पंचधातूची महाघंटा' अर्पण, सांगलीतील भाविक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 1:47 PM