जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिल्या श्रावण रविवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावणानिमित्त महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.श्रावण मासास प्रारंभ झाल्यामुळे जोतिबा डोंगरावर धार्मिक विधी, उत्सवाची मोठी रेलचेल असते. पहिल्या श्रावणातीत रविवारी भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सकाळी जोतिबा देवाची आकर्षक खडी पूजा बांधण्यात आली. अकरा वाजता धुपारती सोहळा झाला. गुलाल-खोबऱ्यांची उधळण यावेळी करण्यात आली. तसेच चांगभलंचा गजर झाला. भाविकांनी हार, फुले, दवणा वाहून दर्शन घेतले. श्रावण महिन्यामध्ये देवदर्शनाला अधिक दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस, देवस्थानचे कर्मचारी तैनात होते. शुक्रवारपासून श्रावणातील व्रतवैकल्यास प्रारंभ झाला आहे. महिनाभर जोतिबा डोंगरावर पायी दर्शन दिंडी, पारायण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. ३ ऑगस्टला श्रावण षष्ठी यात्रा होणार असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.
श्रावणाच्या पहिल्या रविवारी जोतिबा दर्शनाला भाविकांची गर्दी, येत्या बुधवारी श्रावण षष्ठी यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 5:24 PM