शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

भाविकांनी घेतला कार्तिक दर्शनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 1:24 PM

कोल्हापुरातील भाविकांनी बुधवारी कार्तिक दर्शनाचा लाभ घेतला. वर्षातून एकदा येणाऱ्या या योगावर जोतिबा रोडवरील कार्तिक स्वामी मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देभाविकांनी घेतला कार्तिक दर्शनाचा लाभमंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

कोल्हापूर : कोल्हापुरातील भाविकांनी बुधवारी कार्तिक दर्शनाचा लाभ घेतला. वर्षातून एकदा येणाऱ्या या योगावर जोतिबा रोडवरील कार्तिक स्वामी मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.दरवर्षी तुळशी विवाहानंतर कार्तिक स्वामी दर्शनाचा योग येतो. यादिवशी ‘श्रीं’चे दर्शन घेतल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. या योगावर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाबाहेर कार्तिक स्वामींचे मंदिर आहे.

बुधवारी पहाटे पाच वाजता ‘श्रीं’च्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर अलंकारिक पूजा बांधून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. पुजारी शांतिनाथ कदम यांनी पूजा बांधली. मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने त्या दिवसापासूनच कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविक येत होते.बुधवारी सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत दर्शनाचा योग होता. त्यामुळे सहा वाजल्यापासूनच मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हामुळे सकाळी अकरानंतर गर्दी कमी झाली. दुपारी चारनंतर पुन्हा गर्दीचा ओघ वाढला. सायंकाळी सहा वाजता या रांगा घाटी दरवाजापर्यंत गेल्या होत्या. मंदिराच्यावतीने भाविकांना प्रसादाचे वाटप केले जात होते. या खास दिवसानिमित्त मंदिराला फुला-पानांची तसेच आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती.मोरपीस आणि गैरसमजदरवर्षी कार्तिक दर्शनाच्या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात मोरपिसांची विक्री केली जाते. बुधवारीदेखील हेच चित्र होते. मोर हे कार्तिक स्वामींचे वाहन आहे. भाविक हे मोरपीस विकत घेऊन कार्तिक स्वामींना वाहतात. मात्र, मोरपीस वाहण्याला कोणताही धार्मिक आधार नाही. देवाला वाहण्यासाठी फूल एखादे फळ किंवा प्रसाद आणावा मोरपीस आणण्याची गरज नाही, अशी माहिती पुजारी शांतिनाथ कदम यांनी दिली. कार्तिक स्वामी ब्रह्मचारी आहे, महिलांनी दर्शन घेऊ नये हा सगळा गैरसमज आहे, असेही ते म्हणाले.

 

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर