बेळगाव : बेळगाव पोलीस विभागात कोविड नियंत्रणासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या एडीजीपी आयपीएस अधिकारी भास्कर राव शनिवारी बेळगावमध्ये दाखल झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भेट देऊन कोविडसंदर्भात जनजागृती केली. शहरात सुमारे १५०० मास्कचे वितरण करीत कोविड मार्गसूचीचे पालन करण्यासंदर्भात आवाहन केले. सुरुवातीला अंजुमन संस्थेला भेट देऊन मुस्लिम समाजातील नेत्यांशी चर्चा केली. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड मार्गसूचीचे पालन करून नमाज पठाण करावे, तसेच आपापल्या घरीच नमाज पठाण करावे, कोविड संदर्भातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यानंतर विविध चर्चनादेखील भास्कर राव यांनी भेट देऊन समाजप्रमुखांशी चर्चा केली.
डीजीपी भास्कर राव यांनी शहरात केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:24 AM