कोल्हापूर : अंगावर शहारे आणणारी शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके... एकटप्पा क्रिकेटमधून जागलेल्या बालपणीच्या आठवणी... रिंगणनाट्यातून परिवर्तन आणि विवेकाचा जागर... योगसाधनेतून आरोग्याचा मूूलमंत्र... रंकाळ्याच्या कठड्याशेजारी एकाग्रतेने चित्र रेखाटणारे चित्रकार... असे उत्साही वातावरण रविवारच्या रम्य सकाळी अनुभवायला मिळाले. निमित्त होतं, रंकाळा जुना पदपथ येथे ‘लोकमत’ने आयोजित ‘धमाल गल्ली’ उपक्रमाचे. रविवारचा दिवस सुटीचा अन् सवडीचा असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांनाही रविवारची सकाळ पर्वणीच ठरली. या उपक्रमात उपस्थितांनी मनसोक्त मौजमजा लुटली. कोल्हापुरातील रंकाळा जुना पदपथ उद्यानात दंग होऊन सर्वजण विविध खेळात रममान झालेले होते. या उपक्रमाचे ‘केएमटी’चे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले व प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयाचे बी. के. रघुनाथ यांच्या हस्ते रोपाला पाणी वाहून उद्घाटन झाले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, इव्हेंट व्यवस्थापक दीपक मनाठकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘धमाल गल्ली’ची सुरुवात वेदा सोनुले व वैदेही जाधव यांच्या व्यंकटेश स्तोत्र गायनाने झाली. या धमाल गल्लीत अगदी पारंपरिक युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांसह बिट्ट्या, चिंचोके, झुंबा डान्स, जंपरोपची प्रात्यक्षिके, आईचं पत्र हरवलं, रस्सीखेच, दोरी उड्या, योगासने, गिटारवादन, अंगाभोवती रिंग फिरविणे, एक टप्पा क्रिकेट, पथनाट्य, टायर पळविणे, आकर्षक रांगोळी असे एक ना अनेक खेळ, उपक्रम उपस्थितांना छंद पाहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाले. ‘सार्थक क्रिएशन’च्या कलाकारांनी ‘बंदे है हम उसके, हमपे किसका है जोर...’ यासह विविध गीतांवर नृत्य सादर करीत उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात वाहवा मिळविली. अक्षय डोंगरे व विक्रम रेपे यांच्या बहारदार निवेदनाने या उपक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. यावेळी गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरून ये-जा करणारे वाहनधारकही याचा आनंद लुटत होते. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांची एकच गर्दी झाली होती. या उपक्रमाची सांगता रिषिका चौगुले हिने सादर केलेल्या ‘रखमा म्हणत्यात मला’ या नाट्यछटेने झाली.आणखी छायाचित्रे पान ८ वर पुढील ‘धमाल’ महावीर उद्यानात...‘लोकमत धमाल गल्ली’चा पुढील उपक्रम रविवारी (दि. ३ मे) नागाळा पार्क येथील महावीर उद्यान येथे सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे.वडणगे (ता. करवीर) येथील स्मिता प्रकाश गायकवाड यांनी या उपक्रमात उलटे गाणे व उलटे शब्द म्हटले. या अनोख्या आविष्काराने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.नाट्यछटा सादर करून उपस्थितांना हसायला लावणारी रिषिका चौगुले.संकलन : गणेश शिंदे, प्रवीण देसाई, छाया : आदित्य वेल्हाळआईचं पत्र हरवलंय! या खेळात बालगोपालांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.कोल्हापुरात रविवारी सकाळी रंकाळा जुना पदपथ उद्यान येथे आयोजित ‘लोकमत धमाल गल्ली’ या उपक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर महापालिकेचे परिवहन विभागाचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांच्या हस्ते रोपाला पाणी वाहून करण्यात आले. डावीकडून महेश सोनुले, सागर बगाडे, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, बी. के. रघुनाथ, पंडित पोवार, डॉ. शरद हुन्सवाडकर, महेश कदम, वनिता ढवळे उपस्थित होते.दुर्मीळ झालेला टायर पळविण्याचा खेळ खेळताना मुलगा.कोल्हापुरी फेटा बांधून बालक सहभागी...‘लोकमत धमाल गल्ली’ या उपक्रमात साने गुरुजी वसाहत परिसरातील अर्जुन सरनाईक या बालकाने लाल रंगाचा कोल्हापुरी फेटा परिधान केला होता. हे बालक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.जंपरोपची प्रात्यक्षिके पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील कन्या विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थिनींनी जंपरोपची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना जागेवर खिळवून ठेवले. याला टाळ्यांची दाद मिळाली.कैरी-पन्हे वाटप...रंकाळा जुना पदपथ उद्यानात ‘लोकमत धमाल गल्ली’ या उपक्रमासाठी आलेल्या नागरिकांसाठी हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी मोफत कैरी-पन्हे वाटप केले.सार्थकचा ‘झुंबा’ डान्ससार्थक क्रिएशन्सने या उपक्रमात धमाल उडवून दिली. त्यांनी रिमिक्सवर अप्रतीम नृत्य सादर केले. ‘सार्थक’चे प्रमुख सागर बगाडे यांच्याबरोबर अनिकेत कोल्हापुरे, कौस्तुभ चोडणकर, सुमित सणगर, सचिन पाटील, आकाश पुरेकर, निशा ओसवाल, रोहन सूर्यवंशी, करण रासम, अपूर्वा डवंग यांचा सहभाग होता.कोल्हापुरी फेटा बांधून बालक सहभागी...‘लोकमत धमाल गल्ली’ या उपक्रमात साने गुरुजी वसाहत परिसरातील अर्जुन सरनाईक या बालकाने लाल रंगाचा कोल्हापुरी फेटा परिधान केला होता. हे बालक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
धमाल गल्लीत जल्लोष फुल्ल!
By admin | Published: April 27, 2015 12:07 AM