कोल्हापूर : पाचजणांच्या बरोबर लग्न करून सहाव्याबरोबर संसार करणाऱ्यांची पैशांची आणि सत्तेची मस्ती २०१९ मध्ये जनताच उतरवेल, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिले. युवा शक्तीच्या दहीहंडीच्या निमित्ताने त्यांनी दसरा चौकातून पाटील यांच्यावर निशाणा साधला.‘राष्ट्रवादीशी लग्न करून भाजपबरोबर संसार करणारे’ अशी टीका पाटील यांनी महाडिक यांच्यावर केली होती. त्याला महाडिक काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. भाषणामध्ये आपल्या लोकसभेच्या कामकाजाचा आढावा घेताना खालून सूर्याजी पिसाळांवर बोला, असा गलका सुरू झाला. यावर महाडिक म्हणाले, ‘मनोरुग्ण असलेल्या शिशुपालाचे बलवान कृष्णानेही ९९ गुन्हे माफ केले परंतु १०० व्या गुन्ह्यानंतर शिशुपालाचे काय झाले ते सर्वांना माहिती आहे. महाडिक म्हणाले, ज्यांनी गाडीला भगवा, निळा, हिरवा, पिवळा असे पाच झेंडे लावले आणि ज्यांनी महादेवराव महाडिक यांच्यासाठी दरवाजे उघडण्याचे काम केले, २00४ च्या निवडणुकीत ज्यांनी शाहूपुरीत महाडिक यांच्यासमोर लोटांगण घातले, त्यांनीच नंतर खंजीर खुपसला. अशांनी आमच्यावर खालच्या भाषेत टीका करावी, हे शोभणारे नाही.२००९ मध्ये मला उमेदवारी मिळू नये म्हणून यांनी प्रयत्न केले, परंतु पी. एन. पाटील, मालोजीराजे यांनाही यांनी धोका दिला. लहान वयात सत्ता, संपत्ती, मंत्रिपद मिळालं. मात्र, यांनी खोटे गुन्हे दाखल करणे, अन्याय करणे आणि महामंडळांच्या जागा हडप करण्याचीच कामे केली. कोल्हापूरकरांच्या डोक्यावर टोल आणला आणि आता थेट पाईपलाईनही लादली.हाळवणकरसाहेब, जरा जपूनयांच्याच वडिलांनी पुण्यातील कार्यक्रमामध्ये माझ्या मुलाने आता भाजपमध्ये जावे, अशी जाहीर सूचना केली. तेव्हा हाळवणकरसाहेब जरा जपून, हे गुणी बाळ भाजपमध्ये घेऊन काय करताय, अशी विचारणा धनंजय महाडिक यांनी केली.तोंड उघडले की जयंती नालाभीमा कारखान्याला राज्य बँकेने नव्हे, तर कुठल्याच बँकेने ६५ रुपयांचेही कर्ज दिलेले नाही. तेव्हा चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेला आरोप चुकीचा आहे. परंतु खालच्या पातळीवर जाऊन बोलायची त्यांची पद्धतच आहे. तोंड उघडलं की जयंती नाला, अशी परिस्थिती झाल्याचे महाडिक म्हणाले.पैशाची आणि सत्तेची मस्ती जनताच उतरवेल( पान १ वरुन) महाडिक म्हणाले, ज्यांनी गाडीला भगवा, निळा, हिरवा, पिवळा असे पाच झेंडे लावले आणि ज्यांनी महादेवराव महाडिक यांच्यासाठी दरवाजे उघडण्याचे काम केले, २00४ च्या निवडणुकीत ज्यांनी शाहूपुरीत महाडिक यांच्यासमोर लोटांगण घातले, त्यांनीच नंतर खंजीर खुपसला. अशांनी आमच्यावर खालच्या भाषेत टीका करावी, हे शोभणारे नाही.२००९ मध्ये मला उमेदवारी मिळू नये म्हणून यांनी प्रयत्न केले. परंतु पी. एन. पाटील, मालोजीराजे यांनाही यांनी धोका दिला. लहान वयात सत्ता, संपत्ती, मंत्रिपद मिळालं. मात्र यांनी खोटे गुन्हे दाखल करणे, अन्याय करणे आणि महामंडळांच्या जागा हडप करण्याचीच कामे केली. कोल्हापूरकरांच्या डोक्यावर टोल आणला आणि आता थेट पाईपलाईनही लादली.हाळवणकरसाहेब जरा जपूनयांच्याच वडिलांनी पुण्यातील कार्यक्रमामध्ये माझ्या मुलाने आता भाजपमध्ये जावे, अशी जाहीर सूचना केली. तेव्हा हाळवणकरसाहेब जरा जपून, हे गुणी बाळभाजपमध्ये घेऊन काय करताय, अशी विचारणा धनंजय महाडिक यांनी केली.तोंड उघडले की जयंती नालात्यांना माझा फज्जाही शिवू दिला नाही : महादेवराव महाडिककोल्हापूर : महाडिक कुटुंबीयांच्या दोन पिढ्यांनी कोल्हापूरची सेवा केली आहे. माझ्या लांगेत बोटे घालण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्यांना माझा फज्जाही शिवू दिला नाही, अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सोमवारी रात्री आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.कोल्हापुरातील न्यू गुजरी मित्र मंडळाच्या दहीहंडीप्रसंगी ते बोलत होते. गेले चार दिवस खासदार धनंजय महाडिक व सतेज पाटील यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक काय बोलतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते.महाडिक म्हणाले, माझ्या लांगेत बोटे घालण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. बोलणे सोपे आहे पण, महाडिक करून दाखवितो. महाडिक स्वत:च्या ताकदीवर मोठा झाला आहे. माझ्या लांघेत अनेकांनी बोटे घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना यशस्वी होऊ दिले नाही.भीमा कारखान्याला राज्य बँकेने नव्हे, तर कुठल्याच बँकेने ६५ रुपयांचेही कर्ज दिलेले नाही. तेव्हा चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेला आरोप चुकीचा आहे. परंतु खालच्या पातळीवर जावून बोलायची त्यांची पद्धतच आहे. तोंड उघडलं की जयंती नाला, अशी परिस्थिती झाल्याचे महाडिक म्हणाले.
पैशांची आणि सत्तेची मस्ती जनताच उतरवेल धनंजय महाडिक : सतेज पाटील यांना प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:52 AM
पाचजणांच्या बरोबर लग्न करून सहाव्याबरोबर संसार करणाऱ्यांची पैशांची आणि सत्तेची मस्ती २०१९ मध्ये जनताच उतरवेल, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
ठळक मुद्दे गडहिंग्लजच्या ‘संघर्ष’ने फोडली दहीहंडी