शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

‘दिलबहार’कडून खंडोबाचा धुव्वा

By admin | Published: January 08, 2016 12:45 AM

केएसए लीग फुटबॉल : खंडोबाचा ‘ब’ संघही पराभूत; संध्यामठने २-0 ने केली मात

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धेत छत्रपती शाहू स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ संघाचा तब्बल ६-० अशा गोलफरकाने धुव्वा उडविला, तर संध्यामठ तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’वर २-० अशा गोलफरकाने मात केली. पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभापासूनच दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने सामन्यावर वर्चस्व राखले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दिलबहार तालीम मंडळाच्या सनी सणगरने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ सातव्या मिनिटाला सनी सणगरने वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल नोंदवत सामन्यात २-० अशी आघाडी केली. २४व्या मिनिटाला ‘दिलबहार’ संघाच्या सचिन पाटीलने गोल नोंदवत सामन्यात ३-० अशी आघाडी केली. मध्यंतरापर्यंत ही गोलसंख्या कायम राहिली होती. उत्तरार्धात खंडोबा तालीम मंडळाने आपल्या रणनीतीमध्ये बदल करत थोडा आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये ऋतुराज संकपाळ, आशिष चव्हाण, अजिज मोमीन, मनोज फराकटे यांनी खाते उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण, समन्वच्या अभावामुळे त्यांना अपयश आले. सतत होणारे आक्रमण पाहता ‘दिलबहार’ने पुन्हा एकदा आक्रमकपणे खेळण्यास प्रारंभ केला. यामध्ये ६१व्या मिनिटाला सचिन पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल नोंदवत सामन्यात ४-०ने आघाडी घेतली. या आघाडीनंतर ‘दिलबहार’ संघाच्या अनिकेत जाधवने सलग दोन गोल नोंदवीत सामन्यात ६-० अशी भक्कम आघाडी मिळविली. दुसरा सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी करण्यास सुरुवात केल्याने सामना मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात संध्यामठ संघाकडून अभिजित सुतार, अक्षय सरनाईक, अमोल पाटील, अतिष पाटील, अक्षय पाटील यांनी, तर खंडोबा तालीम मंडळ ‘ब’कडून प्रवीण पाटील, अक्षय मुळे, प्रणित सावंत, स्वराज पवार, अमर मोरे यांनी खाते उघडण्याचे शर्तीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना निर्धारीत वेळेत यश आले नाही. सामन्याच्या जादा वेळेमध्ये संध्यामठच्या अभिजित सुतार व सूरज शिंगटे यांनी गोल नोंदवत सामन्यात २-० अशा गोलफरकाने विजय मिळविला. (प्रतिनिधी)आजचे सामने४दु. २ वा. - पीटीएम ‘अ’ विरुद्ध शिवनेरी ४दु. ३ वा. पोलीस विरुद्ध गोल्डस्टार स्पोर्टस्