कोल्हापूर : धनगर समाजाला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता ढोल गजर आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी येथे बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये आवाज न उठविणाºया आमदार-खासदारांना येत्या निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा मल्हार सेनेचे प्रमुख बबन रानगे यांनी यावेळी दिला.दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे मल्हार सेना, धनगर समाज महासंघ, धनगर समाज युवक संघटना यांच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी आंदोलनाच्या दिशा ठरविण्यासाठीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.आरक्षणाच्या अंमलबजावणीप्रश्नी सरकारने समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत छगन नांगरे, सिद्धार्थ बन्ने, शहाजी सिद, राघू हजारे, प्रल्हाद देबाजे, डॉ. विजय गोरड, बाबूराव बोडके, मायाप्पा धनगर, आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच सरकारविरोधात तीव्र आंदोलन जाहीर करावे असेही सांगितले. त्यावर बैठकीत सरकारला जाग आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने नावीन्यपूर्ण आंदोलन करून आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत ते सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंभकर्णाची झोप घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी दिवसभर ढोल आंदोलन करून जिल्हाधिकाºयांच्या कामात व्यत्यय आणला जाईल. या ठिकाणी पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल.रानगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ज्याप्रमाणे सर्व आमदारांनी एकत्र येऊन अधिवेशनामध्ये पाठिंबा दिला, त्याप्रमाणे धनगर आरक्षण प्रश्नावर एकाही आमदाराने आवाज उठविला नाही. प्रत्येक मतदार संघात धनगर समाजाची निर्णायक मते असून, येणाºया निवडणुकीमध्ये या आमदारांना धडा शिकविला जाईल.बयाजी शेळके म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू असूनही सरकारकडून त्याच्या अंमलबजावणीला विलंब का केला जातो, हे कळत नाही. त्यामुळे आता तीव्र आंदोलनाशिवाय सरकारला जाग येणार नाही.मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केलीसत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निकाली काढू, असे आश्वासन दिले होते; परंतु चार वर्षे उलटली तरी अद्याप काहीच हालचाल न करता त्यांनी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप रानगे यांनी केला.
धनगर आरक्षणप्रश्नी १० रोजी ‘ढोल गजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:39 AM