कोल्हापूर : धनगर समाजाचे नेते, युवा उद्योजक संदीप कारंडे यांनी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शासकीय विश्रामगृहात संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित त्यांनी प्रवेश केला. कारंडे यांनी राज्यभर धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
हातकणंगले येथील संदीप कारंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापुरात राज्यस्तरीय गोलमेज परिषद घेऊन लढा उभारला होता. राज्यातील धनगर समाजाला एकत्र आणून शासन दरबारी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. धनगरवाड्यावस्त्यांवर रस्त्यांसह पायाभूत सुविधांची आजही वानवा आहे. पक्क्या रस्त्यांसह पायाभूत सुविधांसाठी ते शासनस्तरावर प्रश्न मांडण्याचे काम केले.
जिल्हा परिषदेच्या २०१७ च्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून त्यांनी भाजपचे ज्येेष्ठ नेते अरुण इंगवले यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यात थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. इंगवले यांच्या कुणबी दाखल्यावर आक्षेप घेत त्यांनी न्यायालयीन लढाईही दिली.
फोटो ओळी : धनगर समाजाचे नेते संदीप कारंडे यांनी बुधवारी स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. यावेळी पद्माराणी पाटील, प्रा. जालंदर पाटील, राजू शेट्टी, आदी उपस्थित होते. (फोटो-०३०३२०२१-कोल-संदीप कारंडे)