शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
3
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
4
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
5
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
6
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
7
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
8
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
9
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
10
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
11
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
12
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
13
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
14
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
15
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
16
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
17
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
18
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
19
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
20
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग

Kolhapur: धैर्यशील माने-प्रकाश आवाडे-सुरेश हाळवणकर यांचे सूत जुळेना, विधानसभेला वेगळी रंगत शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 5:21 PM

गत लोकसभा निवडणुकीपासून इचलकरंजीतील पाणीप्रश्न अनेकांना भोवला

अतुल आंबीइचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात पाच वर्षात सूत जुळले नाही. त्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर तरी खासदार धैर्यशील माने यांच्यासोबत आवाडे यांचे जुळेल, असे वाटत होते. परंतु निवडणुकीनंतरच्या काही घडामोडींतून अद्याप तरी त्यांचे जुळले नसल्याचेच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेलाही वेगळी रंगत येण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे.एकमेकांविरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले आवाडे-हाळवणकर यांच्यात मनोमिलन होईल, यासाठी काही प्रयत्न झाले. परंतु त्यात यश आले नाही. एकमेकांविरूद्ध कुरघोड्यांच्या राजकारणासह टीकाटिप्पणी सुरूच राहिली. त्यात खासदार माने यांच्या दुर्लक्षपणाच्या भूमिकेमुळे दोघेही त्यांच्यापासून लांब गेले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीकडून माने यांनाच उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या हाळवणकर यांच्यासह आमदार आवाडे यांनाही त्यांचा प्रचार करावा लागला.आवाडे यांना विविध ‘विकासकामांत’ अडथळे आणत असल्याच्या कारणावरून आवाडे हे माने यांच्यावर प्रचंड नाराज होते. जाहीर सभेत त्यांनी उमेदवार बदलाची भाषा केली होती. तसेच अदृशशक्ती महापालिकेमार्फत विकासकामांना अडथळे आणत असल्याचे पत्रकार बैठक घेऊन सांगितले होते. त्यातूनही काही होत नाही म्हटल्यावर आपली ताकद दाखवून देण्यासाठी लोकसभेला उमेदवारीचे हत्यार उपसले होते. आवाडे यांच्या भूमिकेमुळे माने यांना अडचण होईल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाडे यांची मनधरणी करत उमेदवारी मागे घेऊन माने यांनाच पाठिंबा देण्यासाठी तयार केले. यासंदर्भात झालेल्या दोन बैठकीत आवाडे यांनी पाच वर्षात माने यांच्यामुळे झालेल्या अडथळ्यांचा पाढाच वाचला होता. त्यावर निश्चित मार्ग काढला जाईल, अशीही चर्चा बैठकीत झाल्याचे समजले होते.परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे. निवडणुकीनंतर आयुक्तांच्या बदलीचा खेळखंडोबा झाला. त्यात दोन्हीकडील राजकारण दिसले. त्यानंतर झालेल्या आवाडे यांच्या पत्रकार बैठकीतही लोकसभा निवडणुकीनंतर अदृशशक्तीचा त्रास कमी झाला का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर आवाडे यांनी, अदृशशक्तीची राजकीय शक्ती कार्यरत झाली आहे, असे तांत्रिक उत्तर दिले. या घडामोडींवरून दोघांचे जुळले नसल्याचे चित्र दिसत आहे.याचा आगामी विधानसभा निवडणुकीवरही रंगतदार परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार आवाडे यांचे चांगलेच जुळले आहे. परंतु स्थानिक पातळीवर दोघांच्याही प्रतिनिधींसोबत सूत जुळत नसल्याने अडचणींचा अडथळा आवाडे यांना वारंवार पार करावा लागतो.

विधानसभेच्या हालचालीलोकसभा निवडणूक संपते न संपते तोपर्यंत नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा शहरातील पाणीप्रश्न पेटवला जात आहे. सोबत विकासकामांचा दिंडोरा पिटण्याचेही काम सुरू झाले आहे.आवाडे यांचे वक्तव्य धाडसीआमदार आवाडे यांनी इचलकरंजी शहराला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे वक्तव्य केले. त्याला विरोध करत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे यांनी आवाडे यांचे हे म्हणणे निष्क्रियपणा झाकण्यासाठीचा प्रपंच असल्याचे बोलले. गत लोकसभा निवडणुकीपासून इचलकरंजीतील पाणीप्रश्न अनेकांना भोवला आहे. असे असताना आवाडे यांनी शहरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे धाडसी वक्तव्य केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणichalkaranji-acइचलकरंजीdhairyasheel maneधैर्यशील मानेPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरvidhan sabhaविधानसभा