कासार्डे (ता. शाहुवाडी ) येथील श्री क्षेत्र धोपेश्वर मंदिरावर बाजूंच्या भागातील दरड अतिवृष्टीमुळे कोसळून मंदिराच्या शेडचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेली दरड मंदिराच्या भिंतीवर कोसळली. यात नंदी व मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला धोका पोहचला नसला तरी पाण्याच्या प्रवाहामुळे मंदिराच्या सभोवतालच्या मातीचा खच साचला आहे. मंदिराच्या दरडी बाजूच्या पत्र्याच्या शेडवर दरड कोसळली.याच शेडमध्ये पुजारी वास्तव्य करतात. दरड कोसळण्याचा आवाज झाल्याने पुजारी कुटुंबासह बाजूला गेले. मंदिराच्या बाजूला उंच कडा,दरी आहे.या दरडी धोकादायक ठरून मोठी वित्त व जीवितहानी होऊ शकते.यासाठी स्थानिक देवस्थान समिती, प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.