अरविंद सखाराम पाटील (वय २८), नाना कृष्णा ढेरे (७०), रामा हरी पाटील (८०), लता बंडोपंत पाटील (६५), शोभा हिंदुराव लिंगडे (४५), शालाबाई ज्ञानू कांबळे (५५), सात्ताप्पा चौगले आवळीकर (५०) आदींना चावा घेत जखमी केले. या सर्वांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले कुत्र्याचा हा अवतार पाहून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद लिंगडे यांनी दिनकर पाटील, उत्तम लिंगडे, राजू पाटील, मयूरेश पाटील ,राजेंद्र चौगले, अक्षय हुजरे, रणजित चव्हाण, रणजित पाटील (गोट्या )आदी तरुणांना बरोबर घेत कुत्र्याला गावातून पहिले हाकलून लावत गावाबाहेर घालविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे त्यांच्याही अंगावर धाऊन जात होते, मात्र, या तरुणांनी धाडस दाखवत हातात काठ्या घेत कुत्र्याला ठार केले.
आमजाई व्हरवडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:21 AM