शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

सीपीआर चौकात धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:09 AM

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचे पुतळारूपी अस्तित्व ज्या परिसरात आजही आहे, त्यांच्या विचाराने जो परिसर सुगंधित झाला आहे, त्याच दसरा चौक , सीपीआर चौकाने बुधवारी दुपारी जातीय विद्वेष किती टोकाला जाऊ शकतो याचा अनुभव घेतला. कमालीच्या तणावात तब्बल दोन तास हा चौक स्तब्ध होता. दोन्ही समाज दगडफेक करीत आमने-सामने ठाकले ...

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचे पुतळारूपी अस्तित्व ज्या परिसरात आजही आहे, त्यांच्या विचाराने जो परिसर सुगंधित झाला आहे, त्याच दसरा चौक, सीपीआर चौकाने बुधवारी दुपारी जातीय विद्वेष किती टोकाला जाऊ शकतो याचा अनुभव घेतला. कमालीच्या तणावात तब्बल दोन तास हा चौक स्तब्ध होता. दोन्ही समाज दगडफेक करीत आमने-सामने ठाकले असताना पोलीस प्रशासन मात्र काहीच करायला तयार नव्हते. कोणत्याही क्षणी काही घडू शकेल असा मनाचा थरकाप उडविणारे दृश्य तिथे होते. दुपारी २.२० वाजता सुरू झालेली ही घालमेल पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर, अश्रुधुराची नळकांडी फोडल्यानंतर ४.२० वाजता संपुष्टात आली व हा परिसर मोकळा झाला, परंतु मग पोलीस दोन तास कुणाच्या आदेशाची वाट पाहत होते हा प्रश्न उपस्थित करून..!कोरेगाव भीमाच्या निंद्य घटनेबाबत मंगळवारपासूनच संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे कोल्हापूरची बुधवारची सकाळ उजाडली तीच मुळात भीती पोटात घेऊन; परंतु सकाळी दहापर्यंतचे वातावरण तणावविरहित होते. महाद्वार रोडसह शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या नेहमी गजबजलेल्या भागात शटर डाऊन होती. बंद असल्यामुळे दुपारपर्यंत व्यवहार बंद राहतील, अशा विचाराने लोकही घरातून बाहेर पडले नाहीत.दहा वाजल्यानंतर मात्र वातावरण तापू लागले. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते बिंदू चौकात एकत्र आले. त्यामध्ये प्रा. विश्वास देशमुख, दगडू भास्कर, सुभाष देसाई, दिलीप पवार, उदय नारकर आदींचा समावेश होता. त्यामध्ये आठवले गटाचे नेते कुणी नव्हते. हे नेते कोरेगाव भीमाच्या घटनेचा व राज्य सरकारचा निषेध करत मोर्चाने शहराच्या विविध भागांतून मोर्चाने फेरी काढून परत बिंदू चौकात आले त्यावेळी दुपारचे साडेबारा वाजले होते; परंतु तोपर्यंत मोर्चाला हिंसक वळण लागले होते. तिथे संतप्त कार्यकर्त्यांनी मोर्चाचा समारोपही करू दिला नाही. त्यामुळे जे नेते होते ते तेथून निघून गेले. त्यानंतर शहरातून जे कार्यकर्ते बंदचे आवाहन करत फिरू लागले त्यांना कुणाचेही नेतृत्व नव्हते. त्यातूनच गुजरी परिसर व मुख्यत: शाहूपुरी पहिल्या व दुसºया गल्लीत प्रचंड तोडफोड झाली. तळघरातील गाड्याही जमावाच्या हल्ल्यातून वाचल्या नाहीत. कुठे बघावे तिकडे नुसतीच तोडफोड सुरू होती. गुजरीतील कामगारांनाही जमावाने मारहाण केली. त्यामुळे तेथील काही कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आमदार राजेश क्षीरसागर यांना सांगितली. ते रस्त्यावर आल्यावर हिंदुत्ववादी संघटनांचा जमावही आक्रमक झाला.दुपारी एकच्या सुमारास बिंदू चौकात बघता-बघता दोन-तीन हजार तरुणांचा जमाव एकत्र आला. त्यांच्या हातात भगवे झेंडे होते. कपाळावर भगवी चंद्रकोर व मागे शेंडी असलेल्या तरुणांची संख्या जास्त होती. हा जमाव बिंदू चौकातून ‘जय भवानी... जय शिवाजी...’ अशा घोषणा देत दसरा चौकाकडे चालून गेला. त्याची सुरुवात लक्ष्मीपुरीतील शारदा कॅफेच्या पुढे होती, तर शेवट बिंदू चौकात होता. हा जमाव चालून येत असल्याचे समजल्यावर दसरा चौकातून भीमसैनिकांचाही जमाव तिकडून आला, परंतु हा जमाव तुलनेत कमी होता. दुपारी १.२० च्या सुमारास हा जमाव समोरासमोर येत असल्याचे पाहून पोलिसांनी प्रसंगावधान राखून रस्त्यात पोलीस व्हॅन उभी केली व क्षणात लाठीमार केला. दिसेल त्याला झोडपून काढले... बघता-बघता भीमसैनिक रस्ता दिसेल तिकडे पळत सुटले. त्यामुळे तो जमाव पांगला; परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्ते दसरा चौकात गेले. तिथे पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यावर हा जमावही काहीसा पांगला, परंतु तोपर्यंत शाहूपुरीकडून मोठा जमाव चालून दसरा चौकात आला. बिंदू चौकाकडून आलेला व शाहूपुरीकडून आलेला मोठा जमाव तसाच सीपीआर चौकाकडे चालून गेला. त्याचवेळेला तिकडून सिद्धार्थनगरातून भीमसैनिकही त्याच चौकात आले. त्यात महिलांची संख्याही जास्त होती. त्यावेळी रस्त्यावर मध्यभागी फार कमी पोलीस होते. त्यामुळे ते दृश्य पाहून अंगावर शहारे आले. आता पुढे काय होणार असा मनाचा थरकाप उडाला. दोन्ही बाजूंकडून प्रचंड दगडफेक सुरू होती. एका क्षणाला हिंदुत्ववाद्यांचा जमाव अगदी सिद्धार्थनगराच्या कमानीपर्यंत गेला. त्याचवेळी सोन्या मारुती चौकाकडून आलेला जमावही वसाहतीत दगडफेक करत होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. पोलीस दोन्ही जमावाला रोखण्याचा प्रयत्न करत होते; परंतु त्यांचे बळ अपुरे होते. दुपारी २.२० वाजल्यापासून हा तणाव सुरू झाला. जमाव ऐकत नाही म्हटल्यावर आमदार राजेश क्षीरसागर २.५० वाजता तिथे आले. त्यांनी शांततेचे आवाहन केले आणि मागे दसरा चौकाकडे चला, असे आवाहन केले; परंतु जमाव त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. गाड्या तुमच्या नव्हे आमच्या फोडल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काही आम्हाला सांगू नका, असे कार्यकर्ते त्यांना सुनावत होते. यावेळी तिथे नगरसेवक राहुल चव्हाण, अमर समर्थ, कुलदीप गायकवाड, रवि इंगवले, अजय इंगवले, आदी उपस्थित होते. शेवटी जमाव दाद देत नाही म्हटल्यावरतेही तेथून निघून गेले. पुन्हा तणाव...तासभर तशीच स्थिती. मध्येच रुग्णवाहिका सायरन वाजवत यायची व परिस्थितीचे गांभीर्य वाढवायची. अशा रुग्णवाहिकेच्या पाच-सहा फेºया झाल्या. जमाव त्यास लगेच रस्ता मोकळा करून द्यायचा, परंतु मागे हटत नव्हता. त्यानंतर ३.४५ वाजता पुन्हा आमदार क्षीरसागर तिथे आले. पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे यांनी पोलिसांची स्पीकरची गाडी आमदारांना उपलब्ध करून दिली. त्यांनी गाडीत उभारून पुन्हा शांततेचे आवाहन केले; परंतु तरीही जमाव हटत नव्हता. ते तीच गाडी घेऊन सिद्धार्थनगरापर्यंत गेले व जमाव ऐकत नाही म्हटल्यावर मागे फिरले. आता मात्र पोलिसांच्या हालचाली वेगावल्या. त्यावेळी तिथे राज्य राखीव दलाची तुकडी तैनात होती. त्यांना आदेश सुटले आणि क्षणात लाठीमार सुरू झाला. पोलीस सोन्यामारुती चौकाकडून लाठ्या घेऊन आल्यावर हिंदुत्ववादी तरुणांचा जमाव पळत सुटला. तो काही भाऊसिंगजी रोडला दोन्ही बाजूला गेला व काही दसरा चौकाकडे पांगला. महापालिकेकडे निघालेला जमाव पोलिसांवर दगडफेक करीत होता म्हणून पोलिसांनी अश्रूधुराच्या दोन नळकांड्या फोडल्या. त्याचा मोठा आवाज झाल्याने अनेकांना हवेत गोळीबार झाल्याची शंका आली. जमाव भीतीने रस्ता दिसेल त्या दिशेने पळत सुटला. ५ मिनिटांत सीपीआर चौक रिकामा झाला व तणावही रिता झाला; त्यामुळे कोल्हापूरच्या पुरोगामीपणाच्या मात्र चिंध्या झाल्या. रस्त्यात दगड व चप्पलांचा खच पडला होता. ती परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देत होता.समाधीजवळच शाहूंच्या विचारांना तिलांजलीसिद्धार्थनगराला लागून असलेल्या नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराजांचे समाधिस्थळ विकसित होत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शाहू महाराजांनी संपूर्ण देशाला अस्पृश्यता निवारणाचा संदेश आपल्या कृतीतून दिला. अशा या राजाची समाधी सिद्धार्थनगराला लागून होत आहे. बुधवारी जेव्हा दोन जमाव एकमेकांवर चाल करून गेले त्यावेळी नियोजित समाधिस्थळ त्याचे साक्षीदार बनले. भीमसैनिकांचा एक जमाव सिद्धार्थनगरात पोहोचला त्याचवेळी शिवाजी चौकातून दोन-तीन हजार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जमाव सिद्धार्थनगराकडे गेला.समाधीच्या एक बाजूला हिंदुत्ववादी, तर दुसºया बाजूला भीमसैनिक होते. आमने-सामने एकमेकांना शिवीगाळ करत दगडफेक करत होते. फौजफाटा कमी असल्यामुळे काही पोलीस त्यांना हटविण्याचा प्रयत्न करत होते; परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. सुमारे पाऊण तास एकमेकांवर तुफान दगडफेक होत राहिली. अक्षरश: रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. दोन्ही बाजूने शाहूंच्या विचारांना तिलांजली देऊन आपला राग, द्वेष, मत्सर व्यक्त करत होते. हे पाहून शाहूप्रेमी, आंबेडकरप्रेमींना वेदना झाल्या असतील तर नवलच! कोल्हापूरच्या इतिहासाला कलंक लावणारी घटना बुधवारी शहरात घडली.दगडफेक करणाºयांना बेदम मारहाणशाहूपुरीतील काही आस्थापना, वाहने व हॉस्पिटलवर दगडफेक करून पळून जाणाºयांना नागरिकांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली. त्यात तिघेजण जखमी झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्रक्षुब्ध झालेल्या नागरिकांना आवरण्यात यश मिळविले.‘जमावबंदी’ची घोषणादुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्हीनस कॉर्नर परिसरात पोलिसांनी संचलन करीत जमावबंदी असून नागरिकांनी एकत्रित जमू नये, अशी सूचना दिली. त्यानंतर काही वेळातच हा चौक रिकामा झाला. पोलीस गेल्यानंतर पुन्हा या चौकात कार्यकर्ते रेंगाळले.विद्यार्थी परीक्षेला मुकलेशिवाजी विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. काही विषयांचे बुधवारी पेपर होते. मात्र, ‘बंद’मुळे के.एम.टी., एस.टी. बसेस बंद होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता आले नाही. अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.हजेरीनंतर शाळा, महाविद्यालयांना सुटीशहर ‘बंद’ची हाक भीमसैनिकांनी मंगळवारी दिली होती. मात्र, शाळा, महाविद्यालयांना शिक्षण विभागाकडून सुटी जाहीर करण्यात आली