शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

जिल्ह्यातील ११ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:49 PM

कोपार्डे : हंगाम सुरुवातीला ऊसदरावरून शेतकरी व कारखानदारांतील संघर्षानंतर एफआरपी अधिक १०० रुपये एकरकमी असा समझोता झाल्याने हंगाम सुरळीतपणे सुरू झाले. जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, एक कोटी ३० लाख मे. टन उसाचे गाळप झाले. अजूनही १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शेतात उभा असल्याचा अंदाज शासकीय पातळीवर ...

कोपार्डे : हंगाम सुरुवातीला ऊसदरावरून शेतकरी व कारखानदारांतील संघर्षानंतर एफआरपी अधिक १०० रुपये एकरकमी असा समझोता झाल्याने हंगाम सुरळीतपणे सुरू झाले. जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, एक कोटी ३० लाख मे. टन उसाचे गाळप झाले. अजूनही १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शेतात उभा असल्याचा अंदाज शासकीय पातळीवर व्यक्त करण्यात येत आहे. आजअखेर जिल्ह्यातील ११ कारखान्यांचे गाळप हंगाम संपले असून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कारखान्यांचे हंगाम संपणार आहेत.जिल्ह्यातील २३ कारखान्यांपैकी २२ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम यशस्वीपणे घेतले आहेत. यात सहकारी १५, तर ७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. १२.४५ सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी ३० लाख मे. टन उसाचे गाळप केले. हंगाम सुरुवातीला ऊसदरावरून कारखानदार व शेतकºयांत निर्माण झालेला संघर्ष एफआरपी अधिक १०० रुपये एकरकमी देण्याच्या यशस्वी तोडग्याने निकालात निघाला. पण हंगाम सुरू होताच साखरेचे दर ३७०० रुपये प्रतिक्विंटलवरून २९०० रुपयांपर्यंत घसरल्याने ऊसदर देण्यासाठी कारखानदारांना करावी लागणारी कसरत पाहता याहीवर्षी शेतकºयांना वेळेवर ऊस बिले मिळतात की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची एफआरपी २७०० ते ३००० रुपयांच्या आसपास आहे. अखेर सर्वच शेतकºयांना पैसे देण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीला ठरलेल्या फॉर्म्युल्याला बगल देत कारखानदारांनी प्रतिटन २५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. उर्वरित रक्कम हंगाम संपल्यानंतर देण्याचे जाहीर केले. या निर्णयाला प्रथम शेतकरी संघटनांनी विरोध केला; पण साखरेचे घसरलेले दर व घटलेली मागणी पाहता नरमाईचे धोरण घेतल्याचेच चित्र दिसत आहे.कारखानदारांना ऊसतोड मजूर, वाहतूक यंत्रणेच्या तुटवड्याने हंगाम संपेपर्यंत दैनंदिन गाळप उद्दिष्ट गाठताना कसरत करावी लागत होती. हंगाम संपताना तर शेतात ऊस असून ऊसतोड मजुरांअभावी उसाची उपलब्धता होत नसल्याने ‘नोकेन’सारख्या तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना तीन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये गाळप करीत कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्याची कसरत करावी लागेल.अ. साखर कारखान्याचे नाव ऊस गाळप साखर साखरनं. (मे.टन) (क्विंटल) उतारा१ वारणा वारणानगर १०४१६०० १२६२१०० १२.१५२ पंचगंगा इचलकरंजी ५१०३१० ६५९९४० १२.०७३ कुंभी-कासारी, कुडित्रे ६२२०५० ८१०६३० १३.१२४ दूधगंगा-वेदगंगा, बिद्री ५३८४८७ ६९३५५० १२.८७५ भोगावती, परिते ४६६६६४ ५५८५० ११.९१६ दत्त, शिरोळ १०५६५३० १३०३६५० १२.३४७ गडहिंग्लज, हरळी २८७६९७ ३३२५६० ११.३०८ छ. शाहू कागल ७४८७६५ ९१३२०० १२.३६९ जवाहर, हुपरी १४७३३०० १८४४२५० १२.६५१० छ. राजाराम, क. बावडा ४३८३८० ५३५७७० १२.६४११ आजरा २८२३२२ ३५१०५१ १२.०२१२ उदय गायकवाड (अथणी शुगर) ३१३२२९ ३७९५८० ११.७४१३ स. मंडलिक, कागल ४८१९५८ ५९२८०० १२.५०१४ शरद, नरंदे ६०७४९५ ७५४२०० १२.३८१५ डी. वाय. पाटील, पळसंबे ३८८०८० ४७३७०० १२.२२१६ अथणी शुगर (इंदिरा गांधी महिला) २८११२४ ३२४९०० ११.२० बंद१७ दालमिया दत्त असुर्ले ८४५३९५ ११२३२०० १३.३३१८ गुरुदत्त, टाकळी ६४४६४० ८४२६७० १२.६५१९ इको केन (नलवडे शुगर्स) २२५४८३ २८२५८० ११.९२२० हेमरस इंड. ५५९८३१ ७२४४१५ १२.७१२१ महाडिक शुगर्स २२८५७१ २५७४८० ११.१७२२ सेनापती संताजी घोरपडे ७४०७६ ८७०१६० १२.३६