वाठारच्या मैदानावर अश्वमेध स्पोर्टस व महेश जगताप आयोजित एम. जे. चषक क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला. अंतिम चार संघांमध्ये जयसिंगपूर डायमंड, बुवाचे वाठार, वाळवा स्पोर्टस्, आबा वाईंगडे स्पोर्टस्, उचगाव यांनी धडक दिली होती. अंतिम सामना जयसिंगपूर विरुद्ध बुवाचे वाठार संघात झाला. त्यात जयसिंगपूर संघाच्या मकवानाने झंझावाती खेळी करत सहा षटकांत संघाची धावसंख्या ११६ वर पोहोचविली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बुवाचे वाठारचा संघ ४० धावांत कोलमडला. ६६ धावांनी जयसिंगपूरचा डायमंड संघ एम. जे. चषकचा मानकरी ठरला, तर मकवाना सामनावीर ठरला.
विजेत्यासह उपविजेते व उपांत्य फेरीत अन्य दोन संघांना आमदार राजू आवळे यांच्या हस्ते चषक, रोख रक्कम देण्यात आली.
युवक काँग्रेसचे कपिल पाटील, रामभाऊ लोकरे, ज्येष्ठ नेते नानासोा मस्के, ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, महेश शिर्के, सचिन कुंभार, महेश जगताप, आण्णा शिंदे, जावेद कुरणे, अमोल लठ्ठे, रूपेश पाटील, उमेश पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी: वाठार (ता. हातकणंगले) येथील अश्वमेध स्पोर्टस् व महेश जगताप आयोजित एम. जे. चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या जयसिंगपूरच्या डायमंड संघाला बक्षीस देताना आमदार राजूबाबा आवळे.