कोल्हापूर : कोरोनामुळे केंद्र सरकारतर्फे मे आणि जून महिन्यात अंत्योदय, प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना मोफत धान्य दिले जाते. मात्र अजूनही या गटात नसलेले पण गरीब, सर्वसामान्य कुटुंबांना हे धान्य मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. पण नव्याने या यादीत नावांचा समावेश करण्याची प्रक्रिया तालुका पातळीवरच रखडली आहे. यामुळे पात्र असूनही यादीत नाव नसल्याने मोफत धान्य वाटप करता येत नाही, असे जिल्हा पुरवठा प्रशासनाचे म्हणणे आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून अंत्योदय, प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना मे, जून महिन्यात मोफत धान्य दिले जात आहे. पण अलिकडे पात्र असलेल्या कुटुंबांची या गटात समावेश करण्याची व्यापक मोहीम महसूल प्रशासनाने राबवलेली नाही. यामुळे गावागावातील अनेक पात्र कुटुंब मोफत धान्यापासून वंचित राहिले आहेत. परिणामी संबंधित कुटुंबांची जगताना ओढाताण होत आहे.
१) पाॅईंटर्स
एकूण रेशनकार्डधारक -
बीपीएल - १४५९६५
अंत्योदय - ५३११६
केशरी - ३१८३५५
२) तिघांच्या प्रतिक्रिया.
हाताला काम नाही आणि रेशनवर मोफत धान्यही नाही, अशी परिस्थिती अनेक कुटुंबांची आहे. संबंधित कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यांचे जगणेही अडचणीचे झाले आहे. यामुळे सर्व गरिबांना सरकारने मोफत धान्य द्यावे.
दिलदार मुजावर, विक्रमनगर
अंत्योदय, प्राधान्य गटाच्या यादीत नाव नसल्याने अनेक गरीब कुटुंबांना धान्य मिळत नाही. प्रशासनाने रेशनकार्ड असलेल्या सर्वांना मोफत धान्य द्यावे. प्रतिमाणसी आता मिळणारे धान्य तुटपुंजे आहे. त्यात वाढ करून मिळावे.
अनिल मोरे, शिंगणापूर
रेशनकार्डावर गहू, तांदळासोबत इतर जीवनावश्यक साहित्याचे मोफत वाटप करावे. कोरोनामुळे गरिबी वाढली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मदत करावी. यादीत नाव नाही, म्हणून धान्य देणे बंद करू नये. गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांनाही मोफत धान्य मिळावे.
विद्या मांगुरे, मंगळवारपेठ
३) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा कोट
सरकारच्या आदेशानुसार मे-जून महिन्यात पात्र रेशनकार्डधारकांंना मोफत तांदूळ, गहू दिले जात आहे. नियमाप्रमाणे धान्य न मिळाल्यास किंवा मोफत असूनही पैसे घेणाऱ्या दुकानदारांविरोधात तहसीलदार, जिल्हा पुरवठा प्रशासनाकडे तक्रार करावी. तक्रारीची दखल घेत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
४) धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
काही ठिकाणी धान्य न घेता अंगठा (थंब) घेण्याचे प्रकार घडत आहेत. पण लाभार्थी गरीब असल्याने त्यांना प्रशासनापर्यंत पोहचण्यात अडचणीत येतात. म्हणून लाभार्थींनी धान्य घेतल्यानंतरच अंगठा मशिनला लाववे, असे पुरवठा प्रशासनाचे म्हणणे आहे.