कोल्हापूर : डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा हप्त्यांमध्येही कमालीची वाढ केल्याने ट्रक व्यवसाय मेटाकुटीला आला आहे.डिझेलच्या किमती प्रतिलिटर ७० रुपयांवर गेल्यामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत आहे. गेल्या महिन्याभरात डिझेलमध्ये प्रतिलिटर ७ रुपयांनी वाढ झाली. महाराष्टÑ सरकारने पेट्रोल-डिझेलसाठी दुष्काळ निवारणचा अधिभार लावल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती इतर राज्यांपेक्षा सर्वांत जास्त महाराष्टÑात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून अहमदाबाद (गुजरात), राजस्थान, केरळ, बंगलोर, नागपूर, मुंबई तसेच कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश येथेही मालवाहतूक ट्रकद्वारे साखर, गूळ, धान्य, कडधान्य, किराणा भुसारी, सिमेंट, बांधकाम व्यवसायातील स्टील आदी साहित्य पाठविले जाते तर विदर्भ-मराठवाडा तून कडधान्य, ज्वारी, तसेच पंजाबमधून गहू, तांदूळ तसेचमोर्वी (राजस्थान) येथून टाईल्स, मार्बल व विविध फरशा आयात होतात.डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक खर्चात किमान २ ते ३ रुपये प्रतिकिमी वाढ अपेक्षित आहे; पण व्यापारी मालवाहतुकीला वाढीव परवडणारे दर द्यायला तयार नाहीत. परिणामी, आयात-निर्यातीच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक वाहतूकऊस वाहतूक ट्रक : ४५००बॉक्साईट वाहतूक : ११ हजारलोकल मालवाहतूक : एक हजार ट्रकउर्वरित मालवाहतूक : ६ हजार ट्रकबँकांनीही पाठ फिरविलीमालवाहतूक अडचणीत आल्याने ट्रकमालकांना बँकांचे काढलेले कर्ज परतावा करतानाही अवघड बनले. अशा परिस्थितीत नवीन कर्ज देण्यास बँका अथवा फायनान्स कंपन्यांनी पाठ फिरविली.मालट्रक थांबूनव्यापारी मालवाहतुकीला परवडणारे दर द्यायला तयार नसल्याने सध्या वाहतूक परवडत नसल्याने ५० टक्के ट्रक मालवाहतूक आज ठप्प झाली. परिणामी शिरोली जकात नाका, मार्केट यार्ड परिसरात ट्रक थांबून आहेत.
डिझेल दरवाढीने उलाढाल निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:42 AM