शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

महाआघाडी होण्यापूर्वीच बिघाडी

By admin | Published: March 08, 2016 12:27 AM

गडहिंग्लज कारखाना निवडणूक : जागा वाटपात फिसकटले; भाजपचा प्रस्तावही नाकारला, रात्री उशिरापर्यंत घडामोडी

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या विरोधातील महाआघाडीच्या रचनेदरम्यान डॉ. प्रकाश शहापूरकर हे दहा जागांवर ठाम राहिल्याने बिघाडी झाली. शासकीय विश्रामगृहातील सोमवारच्या बैठकीत स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत शहापूकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आठ जागा, अध्यक्षपद, ब्रिक्स कंपनीच्या ताब्यातून कारखाना काढून देण्याचा भाजपचा प्रस्ताव फेटाळत डॉ. शहापूरकर दहा जागांवर ठाम राहिले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाआघाडी रचनेसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. आघाडी रचनेसाठी गुरुवारी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाची लालसा आडवी आली. त्यामुळे विरोधी महाआघाडीची रचना अपूर्ण राहिली. सोमवारी दुपारी बारा वाजता डॉ. शहापूरकर व समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य गणपतराव डोंगरे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, सुभाष शिरकोळे यांनी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ. शहापूरकर यांनी दहा जागा हव्यात तरच आघाडीत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार हाळवणकर म्हणाले, अध्यक्षपद देऊ, आठ जागा देऊ, ब्रिक्स कंपनीच्या ताब्यातून कारखाना काढून दिला जाईल. त्यामुळे दोन पावले पुढे यावे.हा प्रस्तावही अमान्य झाल्यामुळे डॉ. शहापूरकर समर्थकांसह उठून गेले. दहा जागा दिल्या तर महाआघाडीत नाही तर स्वतंत्र लढू, असे कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान, दुपारी अडीच वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हाळवणकर, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याबरोबर बैठक सुरू झाली. अ‍ॅड. शिंदे यांनी आपल्याला किती जागा हव्यात, हे स्पष्ट केले नाही. या बैठकीस डॉ. शहापूरकर गैरहजर राहिले. त्यामुळे आघाडीसंबंधी शिवसेनेचे विजय देवणे, संग्राम कुपेकर, माजी आमदार संजय घाटगे, भाजपचे बाबा देसाई, उदय देसाई, मलगोंडा पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. शहापूकरांना महाआघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करायचे न आल्यास त्यांना वगळून अ‍ॅड. शिंदे, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हत्तरकी गट, अप्पी पाटील यांना घेऊन महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदासह ९ जागांवर तडजोड शक्य...‘महाआघाडी’तर्फे शहापूरकरांना आठ जागा देण्याचे मान्य केले आहे. शहापूरकर दहा जागांवर ठाम आहेत. शहापूरकर यांनी एक जागा कमी केल्यास ९ जागांवर तडजोड होऊ शकते. ‘दहा जागा नसतील तर स्वतंत्र लढू,’ असे शहापूरकर म्हणत असले तरी नऊ जागांसह भाजपने दिलेला प्रस्ताव मान्य करावा, असे त्यांच्याच समर्थकांचे खासगीतील मत आहे. हा प्रस्ताव मान्य करून महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी समर्थक शहापूरकरांची रात्री उशिरापर्यंत मनधरणी करत होते.‘स्वाभिमानी’ गैरहजरमहाआघाडीत गृहीत धरलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील गैरहजर राहिले. त्यामुळे या दोघांची भूमिका स्पष्ट झाली नाही.तीन पायांच्या शर्यतीत नाहीशहापूरकरांची भूमिका : शिंदे, चव्हाणांनी कारखाना तोट्यात आणल्याची टीकाकोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तीन पायांच्या शर्यतीत (आघाडी) मला उतरायचे नाही. दहा जागा मिळाल्या तर महाआघाडीसोबत जाणार, अन्यथा स्वतंत्र लढणार, अशी भूमिका डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी ‘लोकमत’जवळ सोमवारी स्पष्ट केली. डॉ. शहापूरकर म्हणाले, आघाड्यांच्या तीन पायांच्या शर्यतीमुळे कारखान्याचे वाटोळे झाले आहे. महाआघाडीशी जागा वाटपासंबंधी तडजोड न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. महाआघाडीत मी आलो तर अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे पॅनेलमध्ये नको, अशी अट आहे. ही अट मान्य केल्यामुळेच महाआघाडीत सामील होण्याच्या चर्चेत सहभागी झालो. अ‍ॅड. शिंदे यांचे यापूर्वीचे राजकारण विधायकतेपेक्षा घातकीप्रवृत्तीचे आहे. त्यामुळेच आमच्या गटाला बहुमताच्या जागा हव्यात आहेत. अध्यक्ष शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या काळातच कारखाना कर्जबाजारी झाला आहे. सध्या कारखान्यावर सुमारे १७० कोटींचे कर्ज आहे. या दोघांनीही कारखाना बुडविला आहे. म्हणूनच मी पॅनेलमध्ये शिंदे नकोची भूमिका घेतली आहे. माझी ही भूमिका कायम राहणार आहे. माझ्या काळात कारखान्याच्या तोट्याला सुरुवात झाली हा शिंदेंचा आरोप खोटा आहे. कारवाईची भीती दाखवून आमदार हसन मुश्रीफ यांनी कारखाना ब्रिस्कच्या घशात घातला आहे. नियमबाह्यपणे कारखाना मुश्रीफ यांनी ताब्यात घेतला आहे. कारखाना ताब्यात घेण्याच्या करारावर सही करण्यासाठी संचालकांना पैसे दिले आहेत, असेही ते म्हणाले.