कोल्हापूर : शहरातील विविध मंदिरांबाहेरील भिकारी, फिरस्ते आणि स्मशानभूमीतील रक्षाविसर्जनवेळी ठेवण्यात येणाऱ्या नैवद्यावर स्वत:ची भूक भागविणाऱ्या लोकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांकडून अन्नधान्याच्या मदतीची सध्या गरज आहे.
गरीब परिस्थिती, कोणाचा आधार नसलेले अनेक जण दिवसभर शहरातील विविध परिसरातील मंदिरांबाहेर ठरावीक दिवशी थांबून, तर काही जण दारोदारी फिरून भीक मागतात. त्यात मिळणाऱ्या अल्पोपाहार, पैशातून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. पंचगंगा स्मशानभूमीसह अन्य स्मशानभूमीत रक्षाविसर्जन दिवशी विविध पदार्थ हे नैवद्य म्हणून ठेवले जातात. त्यातील चांगले पदार्थ एकत्रित करून त्यावर आपली रोजची भूक भागविणारे काही जण आहेत. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, रंकाळा, बिंदू चौक, शिवाजी रोड, दसरा चौक, आदी परिसरातील फुटपाथ, पडक्या इमारती, स्वत:च्या घरात राहणारे असे सुमारे ५०० जण या स्वरूपात गेल्या अनेक वर्षांपासून आपला उदारनिर्वाह करत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. दारोदारी फिरताही येत नाही. स्मशानभूमीतही रक्षाविसर्जन दिवशी नैवेद्य ठेवण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भीक आणि नैवेद्यावर आपली भूक भागविणाऱ्यांची अडचण झाली आहे. अशा भिकारी, फिरस्त्यांना शहरातील मंगळवारपेठेतील टीम गणेशाचे समन्वयक प्रशांत मंडलिक हे त्यांच्या परीने चपाती-भाजी पुरवित आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी अशा लोकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.
चौकट
काय करता येईल?
कोरोनामुळे विविध उत्सव सामुदायिकपणे साजरे करता येत नाहीत. असा सामुदायिक उत्सव करणाऱ्यांनी गरजूंना मदत करावी. उत्तरकार्यावर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ अन्नधान्य वाटप करता येईल. मदतीचे अनेक हात पुढे आले, तर या लोकांना मोठी मदत होईल.
प्रतिक्रिया
मंदिराबाहेर बसून भीक मागणारे आणि स्मशानभूमीतील नैवद्यावर आपली भूक भागविणाऱ्या शहरातील अनेकांची कोरोनामुळे सध्या अडचण झाली आहे. अशा काही जणांना माझ्या परीने मी चपाती-भाजी देत आहे. ही मदत अपुरी पडत आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी अन्नधान्याच्या किटच्या स्वरूपात या लोकांना मदत करण्याची गरज आहे. अशा लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यास आमच्या टीम गणेशाच्यावतीने सहकार्य केले जाईल.
- प्रशांत मंडलिक, समन्वयक, टीम गणेशा.
फोटो (०२०५२०२१-कोल-प्रशांत मंडलिक (मदत) ०१, ०२ : कोल्हापुरातील फिरस्त्यांना मंगळवारपेठेतील प्रशांत मंडलिक हे आपल्या परीने चपाती-भाजी देत आहेत. त्यांच्याप्रमाणे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी या लोकांना सध्या मदत करण्याची गरज आहे.
===Photopath===
020521\02kol_7_02052021_5.jpg~020521\02kol_8_02052021_5.jpg
===Caption===
फोटो (०२०५२०२१-कोल-प्रशांत मंडलिक (मदत) ०१, ०२ : कोल्हापुरातील फिरस्त्यांना मंगळवारपेठेतील प्रशांत मंडलिक हे आपल्या परीने चपाती-भाजी देत आहेत. त्यांच्याप्रमाणे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी या लोकांना सध्या मदत करण्याची गरज आहे.~फोटो (०२०५२०२१-कोल-प्रशांत मंडलिक (मदत) ०१, ०२ : कोल्हापुरातील फिरस्त्यांना मंगळवारपेठेतील प्रशांत मंडलिक हे आपल्या परीने चपाती-भाजी देत आहेत. त्यांच्याप्रमाणे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी या लोकांना सध्या मदत करण्याची गरज आहे.