शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

कर्जमाफीत ‘आयटी’ विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:17 AM

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या

ठळक मुद्देपोर्टलवरील याद्या गायब :कर्जमाफी लोंबकळण्याची शक्यताबॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या आणि त्यानंतर पोर्टलवरून त्या गायब झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. तालुकास्तरीय समितीचे काम ठप्पच राहिल्याने कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या हातात नेमकी कधी पडेल याबाबत संभ्रमावस्था पसरली असून कर्जमाफीचे प्रकरण लोंबकळण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदारांना दीड लाखांपर्यंत तर नियमित परतफेड करणाºयांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने लेखापरीक्षण करून अपलोड केलेल्या याद्यांतील पात्र, अपात्र लाभार्थ्यांची नावे पोर्टलवर जाहीर केली. वास्तविक आयटी विभागाने आयकर परतावा करणारे व सरकार कर्मचाºयांची नावे वगळून पात्र, अपात्र शेतकºयांची नावे जाहीर करायची आहे.

या यादीतून सहकारी संस्थांच्या पदाधिकाºयांची नावे वगळण्याचे काम तालुकास्तरीय समिती करणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती केवळ निरीक्षणाचे काम करून विभागीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे.राज्य सरकारच्या आयटी विभागाने १८ आॅक्टोबरला शेतकºयांची अर्धवट नावे प्रसिद्ध केली आणि पुन्हा गोंधळ उडाला. मंगळवारपासून तर ही यादीही पोर्टलवरून गायब झाल्याने सहकार विभागाला काहीच काम करता येईना. पोर्टलवर यादी नसल्याने तालुकास्तरीय समितीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया लोंबकळत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मंजुरी आधीच जमा-खर्चाने गोंधळ!सहकार विभागाने जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सोमवारी जमा-खर्च करण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले होते; पण कर्जमाफीच्या निकषांनुसार तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिल्याशिवाय ती रक्कम ग्राह्य मानता येत नाही. बॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर मंगळवारी सकाळी तातडीने सहकार विभागाने या समितीची मान्यता घेतली.आजपासून चावडी वाचनग्रामपंचायत आचारसंहितेमुळे थांबलेला चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. वास्तविक सोमवारपासून वाचन सुरू होईल, असे सांगण्यात आले पण गेली दोन दिवस संबंधितांना प्रशिक्षणच देण्यात आले. त्यामुळे आज, बुधवारपासून चावडी वाचनास सुरुवात होणार आहे.