कोल्हापूर : उपांत्यपूर्व फेरीतील चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ (अ)ने खंडोबा तालीम मंडळ (अ)वर २-१ अशा गोलफरकाने मात करीत अवधूत घारगे स्मृती फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सामन्यातील लढवय्या खेळाडू म्हणून ‘खंडोबा’चा सचिन बारामती याला गौरविण्यात आले. शाहू स्टेडियम येथे गुरुवारी दिलबहार ‘अ’ विरुद्ध खंडोबा ‘अ’ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. पूर्वार्धात ३५व्या मिनिटास दिलबहार ‘अ’च्या अनिकेत तोरस्करने दिलेल्या पासवर शुभम् साळोखे याचा फटका गोलरक्षकाने अडविला. याचदरम्यान झालेल्या गोंधळाचा फायदा घेत करण चव्हाण-बंदरे याने गोलची नोंद केली. उत्तरार्धातही दिलबहार ‘अ’च्या अनिकेत जाधव याने गोल करीत आघाडी २-० अशी केली. दिलबहारच्या दोन गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाने जोरदार प्रयत्न केले. ५९व्या मिनिटास खंडोबा ‘अ’च्या चंद्रशेखर डोकाने उत्कृष्ट मैदानी गोलची नोंद करीत आघाडी २-१ ने कमी केली. अखेरपर्यंत त्यांना बरोबरी साधता न आल्याने दिलबहार ‘अ’ने सामना २-१ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. (प्रतिनिधी)शालेय संघाचे आजपासून प्रदर्शनीय सामने अवधूतच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी १५ वर्षांखालील शालेय संघाचे प्रदर्शनीय सामने शुक्रवारपासून खेळविण्यात येणार आहेत. यामध्ये पहिला सामना छत्रपती शाहू विद्यालय विरुद्ध प्रायव्हेट हायस्कूल यांच्यात दुपारी दोन वाजता खेळविण्यात येणार आहे.
दिलबहार (अ) उपांत्य फेरीत
By admin | Published: February 13, 2015 12:44 AM