शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडला : उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:10 PM

नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत चिकोत्रा खोºयात लघु पाटबंधारे प्रकल्पास मंजुरी मिळाली. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोºयात २.१८ टीएमसी पाणीसाठा ...

ठळक मुद्दे४५ टक्के काम पूर्ण राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा

नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत चिकोत्रा खोºयात लघु पाटबंधारे प्रकल्पास मंजुरी मिळाली. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोºयात २.१८ टीएमसी पाणीसाठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार झुलपेवाडी (ता. आजरा) येथे १.८६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, उर्वरित ०.३२ टीएमसी पाणीसाठा दिंडेवाडी-बारवे प्रकल्पात साठवण्याचे ठरले. या प्रकल्पास ३१ जानेवारी २००० रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. सुरुवातीस प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी या प्रकल्पास विरोध केला होता. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना जमीन उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे गाजर दाखविण्यात आले. देवरा यांच्या आश्वासनानंतर काम सुरू करण्यात आले. सन २००७-०८ या हंगामात ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, तेव्हापासून आजपर्यंत काम बंद आहे.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य इतर मागण्या पूर्ण न झाल्यामुळे काम बंद असून आधी पुनर्वसन, मगच धरण अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी घेतली आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे हा प्रकल्प रखडलेला आहे. बुडीत क्षेत्र ८०.११ हेक्टर असून उपसा सिंचनाद्वारे भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी, बारवे, हेळेवाडी, नागनवाडी, पांगिरे तसेच कागल तालुक्यातील मांगनूर, हसूर बु., हसूर खु. या गावांतील ७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून प्रकल्पग्रस्त शेतकºयांना बारवे, दिंडेवाडी, मांगनूर, हसूर बु., हसूर खु., नंद्याळ, अर्जुनवाडा, मेतके, खडकेवाडा, आलाबाद या लाभक्षेत्रातील जमीन उपलब्ध करून देण्याचे आहे. मात्र, कागल तालुक्यातील काही गावांनी जमीन देण्यास नकार देत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे पुनर्वसनाचे काम रेंगाळले.

चिकोत्रा खोºयात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून अपुरा पाऊस, कमकुवत जलस्रोत यामुळे झुलपेवाडी धरणाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे दिंडेवाडी, बारवे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. मात्र, यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. 

भुदरगड तालुक्यातील पूर्वेकडील भागाचा पाण्याअभावी विकास खुंटला असून, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प पूर्ण ह़ोेण्यास आपण सकारात्मक आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड व कागल तालुक्यांतील काही गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार असून, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.- प्रकाश आबिटकर, आमदार