शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Kolhapur: थेट पाइपलाइनला गळती नाही, हा कोणाचा तरी खोडसाळपणा

By भारत चव्हाण | Published: November 11, 2023 7:48 PM

कोल्हापूर : काळम्मावाडी - कोल्हापूर बहुचर्चित थेट पाईपलाईनला हळदी कुर्डू (ता.करवीर) दरम्यानच्या ओढ्यानजीक गळती लागली होती. मात्र, तपासणीअंती कोणी ...

कोल्हापूर : काळम्मावाडी - कोल्हापूर बहुचर्चित थेट पाईपलाईनला हळदी कुर्डू (ता.करवीर) दरम्यानच्या ओढ्यानजीक गळती लागली होती. मात्र, तपासणीअंती कोणी तरी खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. हवा निघून जाण्यासाठी लावलेले नटबोल्ट काढल्यामुळे हे पाणी बाहेर पडल्याचे सांगण्यात आले.

जल वाहिनीतील हवा निघून जाण्यासाठी एअर व्हॉल्वबरोबरच व्हेंटपाइप काढल्या आहेत. या व्हेंटपाइपवर फ्लॅन्क लावण्यात आले आहेत. कोणी तरी अज्ञाताने याचे नटबोल्टच काढले असल्याचे आढळून आले. कोणी तरी जाणकार व्यक्तीने या फ्लॅन्कचे नटबोल्ट काढले असावेत, असा संशय घेतला जात आहे. कोणाचा तरी खोडसाळपणा शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्यावर उठण्याची शक्यता असल्याने जलवाहिनी, जॅकवेल, ट्रान्सफार्मर या ठिकाणी प्रवेश बंदी करायला पाहिजे. अन्यथा असे प्रकार यापुढेही घडू शकतील.

कोल्हापुरात पाणी पोहोचले

गेल्या नऊ वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइनचे पाणी अखेर कोल्हापुरातील पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर काल, शुक्रवारी रात्री पोहोचले. काळम्मावाडीहून ५३ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून जेव्हा धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित असलेले माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी गुलालाची उधळण तसेच मोठ्या प्रमाणात आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला होता

कोल्हापूरकरांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्यावर पर्याय म्हणून काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला होता; तर ही योजना मंजूर होण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती. त्यानंतर राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेकरिता ४८८ कोटींना निधी मंजूर झाला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी