शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

‘थेट पाईपलाईन’ काम निकृष्ट दर्जाचे, त्रयस्त यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 6:43 PM

पालकमंत्री म्हणतात की, ८८७ दिवस चंद्रकांत पाटील यांनी काम रखडविले. जर पाटील यांना तसे करायचे असते तर मग केंद्र सरकारचा निधीच थांबविला असता. पण त्यांनी तसे केले नाही. योजना लवकर पूर्ण व्हावी अशीच आमची सर्वांची इच्छा आहे. फक्त ती दर्जेदार, गुणवत्तेच्या निकषावर असावी, असे सत्यजित कदम म्हणाले.

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम लवकर संपविण्याच्या प्रयत्नात अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, राज्य तसेच केंद्र सरकारने कामाची त्रयस्त यंत्रणेमार्फत तपासणी करावी, अशी मागणी भाजप व ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी केली. महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे योजनेच्या कामावर नियंत्रण नसल्यामुळे ७० कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर पडल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

भाजप व ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी धरणक्षेत्रात जाऊन तेथे सुरू असणाऱ्या योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्यंवंशी, अजित ठाणेकर, विजय खाडे पाटील, आशिष ढवळे, किरण नकाते, वैभव माने, भगवान काटे, संग्रामसिंह निकम उपस्थित होते. त्यांना महापालिकेचे उपअभियंता सुरेश नागरगोजे व कन्सल्टंन्सीचे प्रतिनिधी आर. बी. पाटील यांनी माहिती दिली.पत्रकारांना माहिती देताना सत्यजित कदम यांनी सांगितले की, ४२५ कोटी ४१ लक्ष खर्चाची योजना १५.४८ टक्क्यांनी जादा दराने मंजूर केली. त्यामुळे महानगरपालिकेवर ७० कोटींचा अतिरिक्त बाेजा पडला. केंद्र सरकारच्या ६० वाट्याचे २५५.२४ कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे. सन २०१७ पर्यंत योजना पूर्ण करायची होती; पण योजनेचे काम पूर्वनियोजित पद्धतीने न केल्यामुळे योजना पूर्ण व्हायला विलंब झाला. योजना लवकर पूर्ण होऊन शहरवासीयांना चांगले पाणी मिळावे. परंतु, कोणाच्या तरी आमदारकीसाठी योजनेचे काम घाईगडबडीने उरकले जाऊ नये.

योजनेच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. सध्या सुरू असणाऱ्या दोन जॅकवेल कामावर कोणाही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. १००० एचपीच्या चार पंप पंपाची खरेदी २०१७ मध्ये झाली. ते पंप गंजले असण्याची शक्यता आहे. योजनेचे काम रखडले असताना पंप खरेदी करण्याची का घाई करण्यात आली असा सवाल करून कदम यांनी सांगितले की, जॅकवेलचे काम अजून पन्नास टक्के पूर्ण झालेले नाही. जॅकवेल, इन्टेकवेल, इन्स्पेक्शन वेल दरम्यान अजून पाईपलाईन टाकलेली नाही. त्यामुळे ही कामे या तीन चार महिन्यात तरी होण्याची शक्यता नाही. असे असताना ३१ मे पर्यंत योजनेचे काम पूर्ण करून लोकांना पाणी देणार असे सतेज पाटील, हसन मुश्रीफ सांगत आहेत. ही जनतेची फसवणूक आहे.

भाजपकडून १९ पैकी ११ परवानगी

योजनेसाठी लागणाऱ्या परवानगी न घेताच काम सुरू केले. योजना घाईगडबडीत सुरू करण्यात आली. २०१४ ते २०१९ या काळात भाजपचे सरकार होते. या काळात चंद्रकांत पाटील यांनी १९ पैकी ११ परवानगी मिळवून दिल्या आहेत, असे विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. हेड वर्कचे काम आधी सुरू होणे आवश्यक असताना आधी जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू केले. काम करीत असताना क्वालिटी असेसमेंट रिपोर्ट घेतला नाही. त्यामुळे कामाचा दर्जा संशयास्पद वाटतो, असेही ते म्हणाले.

मग निधीच दिला नसतापालकमंत्री म्हणतात की, ८८७ दिवस चंद्रकांत पाटील यांनी काम रखडविले. जर पाटील यांना तसे करायचे असते तर मग केंद्र सरकारचा निधीच थांबविला असता. पण त्यांनी तसे केले नाही. योजना लवकर पूर्ण व्हावी अशीच आमची सर्वांची इच्छा आहे. फक्त ती दर्जेदार, गुणवत्तेच्या निकषावर असावी, असे सत्यजित कदम म्हणाले.

जनतेचे पैसे खर्च

योजनेसाठी कोणाच्या खासगी खिशातून खर्च होत नाही, तर जनतेच्या पैशातून होत आहे. त्यामुळे योजना दर्जेदार झाली पाहिजे. परंतु, सध्या योजनेवर कोणा तज्ज्ञांचे नियंत्रण नसल्यामुळे शंका येत आहे. जो दावा केला जात आहे तो कागदोपत्री दिखावा आहे. केंद्र सरकारने कामाची चौकशी करावी, तशी मागणी आम्ही करणार असल्याचे सुनील कदम यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीBJPभाजपाSatyajit Kadamसत्यजित कदम