शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

अमेरिकेतील विवाहसोहळ्यात मोबाईल लाईव्हद्वारे पडल्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 8:28 PM

CoronaVirus Kolahpur: कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नउ महिन्यापूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाईल लाईव्हचा आधार घेत या महिन्यात पार पडला. कोल्हापूरचा मुलगा आणि पंढरपूरच्या मुलीचा अमेरिकेत पार पडलेल्या या अनोख्या विवाहसोहळ्यात महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच सहभागी झाले, आणि नातेवाईक, मित्रमंडळींनी मोबार्ईल लाईव्हद्वारेच ऑनलाईन अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्दे अमेरिकेतील विवाहसोहळ्यात मोबाईल लाईव्हद्वारे पडल्या अक्षता कोरोनातील लग्नाची गोष्ट : कोल्हापूरचा युवक परदेशात विवाहबध्द

संदीप आडनाईककोल्हापूर : कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नउ महिन्यापूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाईल लाईव्हचा आधार घेत या महिन्यात पार पडला. कोल्हापूरचा मुलगा आणि पंढरपूरच्या मुलीचा अमेरिकेत पार पडलेल्या या अनोख्या विवाहसोहळ्यात महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच सहभागी झाले, आणि नातेवाईक, मित्रमंडळींनी मोबार्ईल लाईव्हद्वारेच ऑनलाईन अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या.कोल्हापूरातील नागेश कुंभार यांचा मुलगा अभिषेक आणि पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता यांचा विवाह सर्वसंमतीने मार्च २०२० मध्ये निश्चित झाला होता. दोघेही उच्चशिक्षित आहेत. अभिषेक हा अमेरिकेतील एका कंपनीत नोकरी करतो, तर स्मिता पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करते.कोरोनाची परिस्थिती दूर झाल्यानंतर कोल्हापूरात विवाहसमारंभ करण्याचे ठरले. विवाहाचा शुभमुहूर्तही काढण्यात आला. परंतु कोरोनामुळे अभिषेकला भारतात जाण्याची परवानगी मिळाली नाही. विवाह निश्चित होउन नउ महिने उलटले तरी त्याला भारतात येण्याची परवानगी मिळाली नाही. अखेर दोन्हींकडच्या नातेवाईकांनी अमरिकेतच जाण्याचे ठरवले.सर्वांनी पासपोर्ट तयार केले आणि व्हिसा मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत सर्वजण होते. मुहूर्त तर काढलेला, समारंभासाठी हॉलही ठरलेला होता. सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच नवरदेवाला सुटी न मिळाल्याने या मंगल सोहळ्यात विघ्न आले. पुन्हा सारेच हताश झाले. शेवटी वऱ्हाडी मंडळीशिवाय मुलीने एकटीनेच जाण्याचे ठरविले आणि विमानाने ती अमेरिकेत पोहोचली. सासुसासऱ्यांनीच कोल्हापूरातून येत पुण्याच्या विमानतळावर सुनेची पाठवणी केली.१७ एप्रिल रोजी अमेरिकेतील मिशिगन येथे व्यंकटेश्वराच्या मंदिरात सनईच्या निनादात आणि भटजींच्या मंगलाष्टकाच्या सूरात अमेरिकन वेळेनुसार सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार गोरज मुहूर्तावर सायंकाळी ७ वाजता ठरल्याप्रमाणे मोजक्याच मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत अखेर हे शुभमंगल निर्विघ्न पार पडले. या अनोख्या विवाहसोहळ्यात फेसबुक लाईव्ह आणि युट्यूबवरुन ऑनलाईन लाईव्हफेसबुक लाईव्ह आणि युट्यूबवरुन महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच ऑनलाईन सहभागी झाले. नातेवाईकांनी तसेच मित्रमंडळींनी दूरुनच अक्षता टाकल्या आणि मोठ्यांनी शुभाशिर्वाद दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नkolhapurकोल्हापूर