इचलकरंजी : संभाव्य महापूर व अतिवृष्टीचा सामना करण्याच्यादृष्टीने येथील नगरपरिषद प्रशासनाकडून पूर्वतयारी व नियोजनासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन आराखडा पुस्तिका आणि आपत्कालीन काळात उपयुक्त असणाऱ्या महत्त्वाच्या टेलिफोन डिरेक्टरी २०२१ चे प्रकाशन मान्यवरांनी केले. नगर अभियंता संजय बागडे व आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट सर्व बाबींची माहिती देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
महापूर काळात पालिकेस सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपमुख्याधिकारी केतन गुजर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, सुभाष देशपांडे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.