कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- राजाराम, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण ८ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३४.३७ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ५४. ८३८ इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी ४३.३६ दलघमी, वारणा ३८७.४२ दलघमी, दूधगंगा २६८.३२ दलघमी, कासारी ३१.०५ दलघमी, कडवी २९.६९ दलघमी, कुंभी३१.७१ दलघमी, पाटगाव ३४.८८ दलघमी, चिकोत्रा १६.५३ दलघमी, चित्री १४.१२ दलघमी, जंगमहट्टी ८.३७ दलघमी, घटप्रभा ४२.७३ दलघमी, जांबरे १०.११ दलघमी, कोदे (ल पा) ४.६८ दलघमी असा आहे. बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम १६.६ फूट, सुर्वे १८ फूट, रुई ४५.६ फूट, इचलकरंजी ४३ फूट, तेरवाड ४१ फूट, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २८ फूट, राजापूर१७.९ फूट तर नजीकच्या सांगली ७.६ फूट व अंकली ९.२ फूट अशी आहे.जिल्ह्यातील राज्यमार्ग बंद
पावसामुळे जिल्ह्यातील एक राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-१९४ मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर एक फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून पर्यायी वाहतुक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे.