शित्तुर वारुण: पावसाचा जोर काल, शुक्रवारपासून कमी झाला असला तरी चांदोली धरणातीलपाणीपातळी नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून ६०० क्युसेक तर चार दरवाजा मधून १५७८५ क्युसेक असा एकूण १६ हजार ३८५ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.आज अखेर एकूण २३४१ मी.मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. धरणात १४५२० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. ३४.४० टीएमसी क्षमतेच्या धरणात ३०.२४ टीएमसी पाणीसाठा झाला असून तो एकूण क्षमतेच्या ८७.९१ टक्के झाला आहे. शित्तुर वारुण परिसरात पूरस्थिती कायम असून मालेवाडी-विरळे, मालेवाडी-सोंडोली, चरण-सोंडोली, आरळा-शित्तुर वारुण, उखळू-शित्तुर वारुण भागातील सर्व मार्ग पाण्याखाली आहेत. पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. गेले आठ दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मोबाइल सेवा बंद झाली असून या दुर्गम भागातील लोक पाऊस, वारा, आणि रात्रीचे गडद काळोख यामुळे भयभीत झाले आहेत.
चांदोली धरणातून विसर्ग वाढवला, पूरस्थिती कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 5:33 PM