कोल्हापूर : शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणारा, कष्टकरी, गरीब, विखुरलेला असा हा लमाण समाज अत्यंत मागासलेला आहे. त्यांचे मागासलेपणही दूर होणे आवश्यक आहे. समाजाची ‘जिल्हा तांडा वस्ती’ उभारण्याबरोबरच इतर प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निकाली काढू, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बैठका घेऊ, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.लमाण समाज विकास संघाच्या वतीने शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये संत सेवालाल महाराज जयंती व लमाण समाज मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर निलोफर आजरेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शशांक देशपांडे हे अध्यक्षस्थानी होते.समाजाचे अध्यक्ष रामचंद्र पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले; तर विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संत सेवालाल महाराज यांचे फोटोपूजन महापौर आजरेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्यांसह मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कृष्णाजी हिरूगडे, संतोष राठोड, विमल राठोड, सुनील राठोड, रोहिदास राठोड, पुंडलिक राठोड, राम चव्हाण, प्रकाश चव्हाण, हणमंत राठोड, प्रकाश सातपुते, बबलू चौगुले, अशोक लाखे यांच्यासह अशोक गीते, सई कुंडलिक पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.