कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाºयांमध्ये संभाव्य ड्रेसकोडचीच चर्चा सुरू असून, लवकरच अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान, कर्मचारी संघटनांनी याला विरोध करण्याची भूमिका घेतली असून, याबाबतच्या बैठकीमध्ये हा विरोध मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले.गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना ड्रेसकोड लावण्याबाबत चर्चा सुरू होती. सध्या शिपाई आणि चालक यांना शासकीय आदेशानुसार गणवेश ठरवून दिला आहे. मात्र यातही अनेक शिपाई आणि चालक गणवेश वापरत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अनेकवेळा जिल्हा परिषदेचा कर्मचारी, अधिकारी कोण आहे आणि बाहेरून आलेले अभ्यागत कोण आहे हेदेखील समजून येत नाही.अनेकवेळा कर्मचारी अधिकाºयांदेखत ठरवून दिलेल्या वेळेआधी आणि नंतरही चहाच्या गाड्यावर किंवा जिल्हा परिषद आवाराच्या बाहेर फिरताना आढळून येतात; मात्र नागरिक कुठले आणि कर्मचारी कुठले हे लवकर लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर कर्मचाºयांसाठी ड्रेसकोड करण्याचा विचार सुरू झाला.प्रथम श्रेणीचे अधिकारी, द्वितीय श्रेणीचे अधिकारी आणि लिपीकवर्गीय कर्मचारी असे तीन स्वतंत्र गणवेश केल्यास ते कामकाजाच्या दृष्टीनेही सोईचे होईल, असे सांगत ड्रेसकोडचे समर्थन करण्यात येते.दर दुसरीकडे कर्मचारी संघटनांचा या निर्णयाला विरोध आहे. शिपाई आणि चालकांना ड्रेसकोड असला, तरी त्यासाठी कापडाचे पैसे मिळतात. धुलाई भत्ता मिळतो. तसा भत्ता आणि कापडासाठी निधी जिल्हा परिषद देणार आहे काय? असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्हा परिषदेचे बहुतांशी कर्मचारी हे ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना ड्रेसकोडची सक्ती करणे अव्यवहार्य असल्याचेही कर्मचाºयांचे म्हणणे आहे. बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे.आठवडाभर की चार दिवसनिर्णय लादला जाणार नसला, तरी ड्रेसकोडच्या माध्यमातून चांगला संदेश जाणार असेल, तर तो का नको? असा मुद्दा पुढे येण्याची शक्यता असून, आठवडाभर नसले तरी किमान चार दिवस तरी ड्रेसकोड असावा, यावरही चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते.
कर्मचाऱ्यांमध्ये ड्रेसकोडचीच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 1:07 AM