शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
2
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
3
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
4
भारतानं UNGA मध्ये इस्रायलविरोधातील ठरावाच्‍या बाजूनं केलं मतदान! जाणून घ्या, 193 देशांची भूमिका काय?
5
महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा
6
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच; खरेदीपूर्वी पाहा सोन्याचे लेटेस्ट दर
7
Vaibhav Suryavanshi च्या भात्यातून आली कडक फिफ्टी! लाँग सिक्सरसह दाखवली ताकद (VIDEO)
8
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
9
रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
10
दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा
11
७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
12
महागाईत ग्राहकांना बसणार आणखी एक चटका! Swiggy वरून ऑर्डर करणे महागणार, 'हे' शुल्क वाढणार
13
'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले
14
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
15
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास'
16
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
17
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
18
Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!
19
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

कोल्हापूर महापालिकेत स्वबळासाठी जोर-बैठका, सर्वच पक्षांत चर्चा; सतेज पाटील-हसन मुश्रीफ दुरावणार?

By भारत चव्हाण | Published: December 02, 2024 5:41 PM

भाजपची तयारी जोरात

भारत चव्हाण कोल्हापूर : महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक आघाडी करून लढायची की स्वतंत्र लढायची, याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सर्वच निवडणुकीत राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढून नंतर महापालिकेत आघाडी केली. परंतु, यावेळी मात्र कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने प्रत्येकाला निवडणूक लढवायची आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा स्वतंत्र लढलो तर काय होईल, याची चाचपणी महायुतीमहाविकास आघाडीतील घटक पक्षांची नेतेमंडळी करत आहेत.महायुतीत भाजपसह शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआर आठवले गट यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना, आम आदमी पार्टी तसेच डाव्या पक्षांचा समावेश आहे. महापालिकेच्या प्रभागांची संख्या मर्यादित असणार आहे. शिवाय सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांचे उमेदवारीबाबत समाधान होण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणूनच आघाडी करून लढल्यास कार्यकर्त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात आघाडी झाली होती. तर भाजप व ताराराणी आघाडी यांची युती झाली होती. आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी महापालिकेत सत्ता स्थापन केली. आता राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात फूट पडली आहे. हसन मुश्रीफ भाजपसोबत गेल्याने तसेच राजेश क्षीरसागर शिंदेसेनेसोबत गेल्याने मागचे सर्व संदर्भ बदलले आहेत. पुढील काळात सतेज पाटील, हसन मुश्रीफ व राजेश क्षीरसागर महापालिकेत एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.आगामी निवडणूक स्वतंत्र लढायची की आघाडी करून लढायची, याबाबत सर्वच पक्ष चाचपणी करू लागले आहेत. भाजप तर सर्व जागा लढवण्याबाबत आग्रही आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर भाजपचे नेते, कार्यकर्ते उत्साहात आहेत. स्वतंत्र लढण्यावर स्थानिक नेते ठाम आहेत. शिंदेसेनेचा निर्णय राजेक्ष क्षीरसागर घेणार आहेत. काँग्रेस अद्याप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. त्यामुळे त्यांनी आपले पत्ते अजून खोललेले नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दि. ७ डिसेंबर रोजी कोल्हापुरात येणार आहेत, त्यावेळी त्यांची महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.भाजपची तयारी जोरातविधानसभेवर घवघवीत यश मिळवल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत दि. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत तशा स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले जाते. प्रभागनिहाय कोण निवडून येऊ शकतो, दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे यायला कोण तयार आहे, याची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

ताराराणी आघाडी रिंगणात नसणारमाजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेली ताराराणी आघाडी यावेळी निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाडिक कुटुंबच भाजपमध्ये सामील झाले आहे. या आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी भाजपमधून शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ताराराणी आघाडीऐवजी महाडिक यांना भाजपच्या प्रचारात भाग घ्यावा लागणार आहे.सतेज पाटील, मुश्रीफ दुरावणार?हसन मुश्रीफ गेल्या काही वर्षांपासून सतेज पाटील यांच्यासोबत महापालिकेत सत्तेत आहेत. यावेळी मात्र या दोघांवर पक्षीय बंधनांचा दबाव असणार आहे. जरी ते स्वतंत्र लढले तरी निवडणुकीनंतरही ते एकत्र येतील का? याबाबत शंका आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २५ उमेदवार तयारराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या २५ उमेदवारांची यादी तयार आहे. अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ काय सांगतील, त्याप्रमाणे मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी