शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 5:06 PM

राजेश क्षीरसागर वगळता इतर चौघे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. या चार मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना निधी मिळतो, पण त्यांना दिली जात नसल्याची सल अनेक वेळा यांनी बोलून दाखवली आहे.

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचा झटका बसल्यानंतर शिवसेनेत राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेला जबर धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही नॉट रिचेबल झाल्याने राज्यात खळबळ उडाली. राज्यात सर्वत्र नॉट रिचेबल'चे राजकीय वादळ उठलं असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच माजी आमदारांच्या गाेवा टूरची जोरदार चर्चा रंगली आहे.राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीमधील अंतर्गत कलह उघड झाला. हा कलह शमते न शमते तोच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मंगळवारी सकाळीच शिवसेनेत खळबळ उडाली. त्यात जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर हे मंत्री शिंदे यांच्या सोबत राहिल्याने त्याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरु राहिली. तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुडकर, डॉ. सुजीत मिणचेकर व उल्हास पाटील या पाच माजी आमदारांच्या गोवा टूरची जोरदार चर्चा रंगली.मुंबईत या घडामोडी सुरु असताना हे पाचजण गोव्याकडे का रवाना झाले. राजेश क्षीरसागर वगळता इतर चौघे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. या चार मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना निधी मिळतो, पण त्यांना दिली जात नसल्याची सल अनेक वेळा यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या गोव्याला जाण्याची चर्चा रंगली.

आमचे गोव्याला जाण्याचे पुर्वनियोजित होते. मुंबईतील घडामोडी आम्हाला प्रसार माध्यमातूनच समजल्या. त्यामुळे ज्या चर्चा सुरु आहेत, त्या निरर्थक आहेत. - चंद्रदीप नरके, माजी आमदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ