शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

Kolhapur: जीवनात अयशस्वी झाल्याने निराश, कोपार्डे येथे उच्चशिक्षित तरुणाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 3:43 PM

प्रकाश पाटील कोपार्डे : जीवनात अयशस्वी झाल्याने नैराश्येतून कोपार्डे (ता. करवीर) येथे उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केली. मंथन शरद बेंडकळे (वय ...

प्रकाश पाटीलकोपार्डे : जीवनात अयशस्वी झाल्याने नैराश्येतून कोपार्डे (ता. करवीर) येथे उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केली. मंथन शरद बेंडकळे (वय २२) असे या मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येचा प्रकार काल, रविवारी रात्री उशिरा उघडकीस आला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. मंथनने चार पानी सुसाईड नोट लिहली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंथन हा बी.टेक झाला होता. त्याला कंपनीचा नोकरीसाठी कॉल आल्याने रविवारी आँनलाईन परिक्षेमुळे तो घरी एकटाच होता. भाऊ सागर दुपारी मंडळाच्या मंडप उभारणीसाठी मित्रांनी बोलवल्याने कुंभी कारखान्यावर गेला. तर आईवडील ढेबेवाडी येथे गावी गेले होते.मंथनचे आईवडील व नातेवाईक त्याला दुपारी चार वाजल्यापासून फोन करत होते पण तो उचलत नव्हता.परिक्षेत व्यस्त असेल म्हणून नातेवाईकांनी दुर्लक्ष केले. भाऊ सागर रात्री दहाच्या दरम्यान घरी आला असता त्याने घरात मंथनची शोधाशोध केली. यावेळी वरच्या मजल्यावर मंथनने लोखंडी हुकाला दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने नातेवाईक व मित्रांना याची कल्पना दिली. करवीर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात पाठवला. त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ आहे.जीवनात अनसक्सेस झाल्याने निराश आत्महत्येपूर्वी मंथनने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नका. मला  आई-वडिलांनी भरपूर प्रेम दिले आहे. गैरसमज नको मी जीवनात अनसक्सेस झाल्याने निराश होऊन आत्महत्या केली आहे. यापूर्वी मी  दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असेही चिठ्ठीत लिहले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस