शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

मुरगूडच्या आठवडी बाजाराला शिस्त हवी

By admin | Published: December 09, 2015 9:27 PM

मंगळवारी तोबा गर्दी : आठवड्यातून दोनवेळा भरवण्याची मागणी

अनिल पाटील-- मुरगूड --सीमाभागातील मोठा बाजार म्हणून ओळख असणाऱ्या मुरगूड शहरातील मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला व्यापाऱ्यासह परिसरातील ग्रामस्थांचीही तोबा गर्दी असते. या गर्दीवर उपाय म्हणून आठवड्यातून दोनवेळा शहरामध्ये बाजार भरवणे हितावह आहे. याबाबत काही नागरिक व व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची मागणीही केली आहे. जर दोनवेळा बाजार भरवला तर अगदी शिस्तबद्ध दुकानांची मांडणी करता येईल. तसेच होणाऱ्या लहान-मोठ्या ट्रॅफिक जाम, आदी समस्याही दूर होतील व पालिकेसही याचा फायदा होईल.मुरगूडची बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. शाहू महाराजांनी मुरगूड येथे श्रीमंत पिराजीराव घाटगे कागलकर यांच्याकडून बाजारपेठ नियोजित बसवून घेत १९२५ ते ३० या काळात शिस्तबद्ध बाजारपेठेची उभारणी केली गेली. या अगोदर गावभागामध्ये मारुती मंदिर ते चावडीपर्यंत बाजार भरत होता. या वेळेचा बाजार हा किरकोळ होता; पण शहरात नवीन बाजारपेठ विकसित झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वांत मोठा जनावरांचा बाजार मुरगूडमध्ये सुरू झाला. त्यानंतर हळूहळू मंगळवारच्या आठवडी बाजाराला तोबा गर्दी उसळू लागली. यावर उपाय म्हणून सध्याचा मुरगूड विद्यालयाच्या दारातच भरणारा कोंबडी बाजार, बकरी बाजार पोलीस ठाण्यासमोरील रिकाम्या जागेत भरवावा, बाजारामधील व्यापाऱ्यांचे नियोजन करून बाजाराची जागा वाढवत पोलीस ठाण्यापर्यंत न्यावी. तसेच मिरची बाजार लोकवस्तीमधून हलवून मरगूबाई पाणंदीमध्ये बसवणे गरजेचे आहे.सर्व बाजारपेठ मुख्य रस्त्यावर आणणे गरजेचे आहे. दोन्ही बाजंूचे जोड रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवल्यास वाहने लावण्यास जागा मिळेल. यामुळे बाजाराची लांबी वाढून ग्राहकांना फिरणे सोयीचे होईल. परिणामी, गैरप्रकाराला आळा बसेल.बाजारामधील गर्दी पाहता दोनवेळा बाजार भरवणे हिताचेच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही फायदा होईल आणि पालिकेचे उत्पन्नही वाढेल. याबाबत शहरातील प्रमुख व्यापारी, अधिकारी आदींबरोबर चर्चा करून आपण निर्णय घेऊ.- प्रवीणसिंह पाटील, सभागृह नेता, मुरगूड नगरपालिका.विस्कळीतपणा : चोरट्यांकडून फायदासध्या पोलीस ठाण्यापासून जुना नाका इथपर्यंत नव्या बाजारपेठेमध्येच मंगळवारचा आठवडी बाजार भरतो. परंतु, या बाजाराचे निरीक्षण केल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी कोणत्या वस्तू कोणत्या क्षेत्रात विकाव्यात, याचे नियोजन जरूरीचे आहे. सध्या बाजारामध्ये विक्रेते किती आहे, याची मोजदाद करून त्यांची बसण्याची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. बाजारामध्ये व्यापारी लोक ऊन, पावसाच्या संरक्षणासाठी पाली मारतात. त्यासाठी वापरलेल्या दोऱ्या, काठ्या अस्ताव्यस्त बांधलेल्या असतात. यास्तव नागरिकांना बाजारात पायी ये-जा करणेसुद्धा जिकिरीचे बनले आहे. या अस्ताव्यस्त पसरलेल्या दोरीमध्ये अडकून लहान-मोठे अपघातही घडले आहेत. नेमक्या याच दाटीवाटीचा फायदा घेत चोरटे मोबाईल, पैसे, दागिने यावर डल्ला मारत आहेत.