शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची मागणी 

By संदीप आडनाईक | Published: November 07, 2023 3:41 PM

उद्या दसरा चौकात भुजबळांच्या पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांची ऱाज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मंगळवारी दसरा चौकात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आंदोलकांनी केली आहे. दसरा चौकात आज, बुधवारी दुपारी बारा वाजता निषेध म्हणून भुजबळांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन करण्यात येणार असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे समन्वयक वसंतराव मुळीक आणि ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगितले.भुजबळांनी मराठा समाजाविषयी केलेल्या विधानांमुळे आक्रमक सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बाबा पार्टे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार राजी असताना त्यांचे मंत्री छगन भुजबळ वेगळी भाषा करतात, त्यामुळे त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे का. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना फसविले ते मंत्रीमंडळात असतानाही सरकारविरोधात भूमिका घेतात याचा जाहीर निषेध आहे. त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा.वसंत मुळीक म्हणाले, मनोज जरांगे पाटील आता गल्लीबोळातील नेते नाहीत तर ते मराठ्यांचे नेते आहेत. त्यांना भेटायला आलेल्या माजी न्यायमूर्तींनी त्यांचा उल्लेख सर असा केला असेल तर त्याला भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय सर्व मंत्र्यांना बंधनकारक असतो, त्यामुळे आरक्षणाबाबत निर्णयाविरोधात वक्तव्य करणाऱ्या भुजबळांना मराठ्यांचा राग आहे हे दिसून येते. मराठा समाज त्यांना केवळ नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरू देणार नाही.दिलीप देसाई म्हणाले, सामान्य राजकीय कार्यकर्त्यांने अशाप्रकारचे विधान करणे समजून घेता येईल, मात्र सर्व जातीधर्माचा सन्मान करण्याची शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून हे अपेक्षित नाही, सरकारने त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, भुजबळांसारखे मातब्बर मंत्री सरकारच्याच निर्णयाविरोधात बेताल, बेजबाबदार, दोन जातींत दुफळी माजवणारे आणि शांतता भंग करणारे वक्तव्य करतात. ते भाजपच्या हातातील किल्लीचे खेळणे बनले आहेत. ईडीची भीती दाखवून ते त्यांच्या स्क्रिप्टनुसारच वक्तव्य करायला लावत आहेत. १९६७ मध्ये यादीत नसताना भुजबळांच्या सांगण्यावरुन १९६८ मध्ये माळी समाज व पाटजाती यादीत कशी आली याचा खुलासा सरकारने करावा.या पत्रकार परिषदेला शारंगधर देशमुख, उदय लाड, अवधूत पाटील, चंद्रकांत पाटील, फिरोज खान उस्ताद, संजय पटकारे, सुनीता पाटील, गीता हसूरकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ